कांद्याच्या विक्रमी आवकेमुळे नामपूर बाजार समिती मालामाल : Nashik

उन्हाळ कांद्याचे दर शेतकऱ्यांना परवडणारे नसले तरी वर्षभरातील विक्रमी कांदा आवकेमुळे बाजार समिती मात्र मालामाल झाली आहे.
Onion
Onion esakal

नामपूर (जि. नाशिक) : येथील बाजार समिती आवारात कांदा, डाळिंब, मका, भुसार मालाचे लिलाव होतात. सध्या उन्हाळ कांद्याचे दर शेतकऱ्यांना परवडणारे नसले तरी वर्षभरातील विक्रमी कांदा आवकेमुळे बाजार समिती मात्र मालामाल झाली आहे. कांद्याला किफायतशीर भाव व लिलावानंतर रोख रक्कम मिळत असल्याने गेल्या आर्थिक वर्षात कांद्याची सुमारे २८ लाख ६८ हजार २४० क्विंटल आवक झाली. उन्हाळ, लाल कांद्याच्या विक्रीतून सुमारे चारशे कोटी रूपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे. कांद्यासह डाळिंब, भुसार मालाच्या लिलावातून गेल्या आर्थिक वर्षात सुमारे साडेचार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले.

नामपूर बाजार समितीने कांदा लिलावानंतर रोख पेमेंट सुविधा उपलब्ध करून दिल्याने शेतकऱ्यांचे हित साधले गेले आहे. शहराच्या सर्वांगीण विकासाची अर्थवाहिनी म्हणून नामपूर बाजार समितीने आपली ओळख निर्माण केली आहे. लिलाव प्रक्रियेत शेतमालाला योग्य भाव मिळून शेतकऱ्यांचे हित जोपासले जावे, असा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून बाजार समिती प्रशासनाची विकासाकडे वाटचाल सुरु आहे.

Onion
घरी बसल्या बनवा पासपोर्ट; असा करा ऑनलाइन अर्ज

मोसम खोऱ्यासह साक्री तालुक्यातील शेतकऱ्यांचे कांदा हे प्रमुख नगदी पीक आहे. कांदा दरात दरवर्षी चढ- उतार होत असले तरी शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणात उन्हाळ, पावसाळी, रांगडा (लेट खरीप) अशा कांद्याची लागवड करतात. तीन वर्षापासून सातत्याने कांदा दरामुळे झळ खाणाऱ्या शेतकऱ्यांनी यंदाही मोठ्या कष्टाने कांद्याचे दर्जेदार उत्पादन घेतले आहे. काही महिन्यांपासून कांदा दर कमालीचे घसरल्याने उत्पादनखर्च देखील भरून निघत नसल्याची वस्तुस्थिती आहे. ऐन खरिप हंगामात शेतकरी मातीमोल भावाने कांद्याची विक्री करून खरीप हंगामासाठी सज्ज झाल्याचे चित्र मोसम खोऱ्यात पाहायला मिळत आहे.

महिनानिहाय कांदा आवक (क्विंटलमध्ये)

* एप्रिल २०२१ : दोन लाख ६६ हजार ४४ क्विंटल

* मे : दोन लाख ६० हजार ८६६

* जून : तीन लाख ६० हजार ९२३

* जुलै : तीन लाख ४७ हजार ११७

* ऑगस्ट : तीन लाख २३ हजार ६२७

* सप्टेंबर : तीन लाख २० हजार ५२९

* ऑक्टोबर : तीन लाख २९ हजार ४८३

* नोव्हेंबर : एक लाख ७१ हजार ९११

* डिसेंबर : एक लाख ८६ हजार ४१०

* जानेवारी २०२२ : एक लाख ८५ हजार ४३४

* फेब्रुवारी : ९३ हजार ७७४

* मार्च : एक लाख २२ हजार ११३

गेल्या वर्षातील शेतमालाची आवक (कंसात उलाढाल)

* कांदा : २८ लाख ६८ हजार क्विंटल (४०२ कोटी, ५२ लाख, ९३ हजार १७६)

* भुसार माल : एक लाख ९४ हजार ५८२ क्विंटल (२८ कोटी, ६० लाख, ७५ हजार, ४०५)

* डाळिंब : ५८ हजार १९५ क्विंटल (१६ कोटी ५१ लाख ३४ हजार २८)

* शेतमालाची एकूण वार्षिक उलाढाल : ४४७ कोटी, ६५ लाख, २ हजार ६०९.

Onion
तुम्हाला जर का अपचन, गॅस याचा त्रास असेल तर जेवणानंतर करा ही ५ योगासनं

''नामपूर बाजार समितीच्या मुख्य आवारात लिलावाप्रसंगी पावसाळ्यात शेतकऱ्यांचे होणारे हाल लक्षात घेता सुमारे सव्वातीन कोटी रुपयांच्या विनियोगातून दर्जेदार पद्धतीने पेवर ब्लॉक बसविण्याचे काम सुरू आहे. पावसाळ्यातील लिलावासाठी भव्य पत्र्याचे शेडची उभारण्यात येईल. शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समिती कटिबद्ध आहे.'' - कृष्णा भामरे, सभापती, नामपूर बाजार समिती

''मोसम खोऱ्यात शेतकऱ्‍यांनी उन्हाळ कांदा लागवडीसाठी एकरी ४० ते ५० हजार रुपयांपर्यंत खर्च केला. सध्याचे बाजारभाव बघता उत्पादन खर्चही भागणार नसल्याने शेतकरी हैराण झाला आहे. शासनाने तत्काळ उत्पादन खर्चावर आधारित बाजारभावाचे नियोजन करावे. शासनाने शेतकऱ्यांना किमान पाचशे रुपये प्रतिक्विंटल अनुदान द्यावे.'' - भारत दिघोळे, संस्थापक अध्यक्ष, राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com