esakal | पिंपळगावच्या टोमॅटोचा देशभरा डंका! दररोज एक लाख क्रेट रवाना; सव्वाचारशे कोटी शेतकऱ्यांच्या पदरात
sakal

बोलून बातमी शोधा

tomato oimpalgaoan baswant

लॉकडाऊन आणि त्यानंतर संततधार पावसामुळे यावर्षी शेतकऱ्यांना टोमॅटोचे उत्पादन घेण्यासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागला. कोरोनाचा संदर्भ टोमॅटोला जोडण्याची अफवा पसरली. अशा विपरित परिस्थितीत निफाड, दिडोरी, चांदवड परिसरात मोठे क्षेत्र टोमॅटोच्या लागवडी खाली आले.

पिंपळगावच्या टोमॅटोचा देशभरा डंका! दररोज एक लाख क्रेट रवाना; सव्वाचारशे कोटी शेतकऱ्यांच्या पदरात

sakal_logo
By
एस.डी.आहीरे

नाशिक/ पिंपळगावं बसवंत : टोमॅटोची राजधानी म्हणुन पिंपळगाव बसवंतची ओळख आता अधिक गडद झाली आहे. नाशिकसह परजिल्ह्यातुन शेतकरी येथे टोमॅटो विक्रीसाठी येतात. गोलाकार, कवडी फुटलेला असा दर्जेदार पिंपळगांव बसवंत बाजार समितीतील टोमॅटोचा यंदाही देशभर डंका राहीला. गेल्या दोन महिन्यांपासुन दररोज किमान एक लाख क्रेट टोमॅटो मध्यप्रदेश, उत्तर प्रदेशसह राजधानी दिल्ली पर्यत पोहचले आहे. टोमॅटोचे दर सरासरी 500 रूपये प्रतीक्रेटच्या पातळीवर राहील्याने कोरोनाच्या संकटात उत्पादकांसाठी हे पीक आर्थिक आधार देणारे ठरले आहे.

लॉकडाऊन आणि त्यानंतर संततधार पावसामुळे यावर्षी शेतकऱ्यांना टोमॅटोचे उत्पादन घेण्यासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागला. कोरोनाचा संदर्भ टोमॅटोला जोडण्याची अफवा पसरली. अशा विपरित परिस्थितीत निफाड, दिडोरी, चांदवड परिसरात मोठे क्षेत्र टोमॅटोच्या लागवडी खाली आले. सुरवातीला पाऊस चागंला झाल्याने लागवड वेळवर झाली. मात्र अतिपावसाने टोमॅटोच्या पिकाला दणका बसला. त्याचा उत्पादनावरही परिणाम झाला. तरीही ऑगस्ट महिन्यापासुन नाशिक जिलह्यातील पिंपळगाव बसवंतचा टोमॅटो मध्यप्रदेश, दिल्ली, उत्तरप्रदेश, राजस्थान, गुजरात येथे पोहतच आहे.

हेही वाचा >  हॉटेलमधील आचाऱ्याच्या मृत्यूचे गुढ रहस्य; संशयास्पद घटनेचा पोलीसांकडून शोध सुरू

 दररोज एक लाख क्रेट रवाना...

पिंपळगाव बसवंत बाजार समिती गेल्या दोन महिन्यांपासुन टोमॅटोने गजबजली आहे. हंगाम बहरल्यापासुन दररोज एक लाख क्रेट टोमॅटो परराज्यात ट्रकद्वारे पोहचत आहे. नाशिक, गिरणारे, लासलगांव येथुन 70 हजार क्रेट टोमॅटो परराज्यात पोहचत आहे. नाशिक जिल्ह्यातुन दिड लाख क्रेट हुन अधिक टोमॅटो रवाना होत आहे.

अजुन दोन महिना हंगाम....

ऑगस्टमध्ये टोमॅटो हंगामाचा पडदा उघडल्यानंतर जानेवारीपर्यत हंगाम सुरू असतो. यंदा पावसाने टोमॅटोच्या पिकाची नासाडी केल्याने उत्पादनांवर मोठा परिणाम झालाआहे.त्यामुळे हंगाम महिनाभर आधीच गुंडाळला जाण्याची शक्यताआहे. अजुन दोनमहिने हंगाम सुरू राहणार असुन आवक मात्र घटत जाणार आहे. डिसेंबरच्या मध्यावर हंगाम थांबण्याची शक्यता आहे.

सव्वाचारशे कोटी शेतकर्याच्या पदरात...

टोमॅटो जुगारी पिक म्हणुन हिणवलेजाते.दरातील मोठ्या प्रमाणातील चढउतार त्यामुळे शेतकरी बर्याचदा कंगाल तर कधीकधी माला असे चित्र असते. यंदा मात्र टोमॅटोच्या दराने प्रतिक्रेट 500 रूपयांची पातळी सोडलेलीनाही. तर कमाल 901 रूपये पर्यत भावखाल्ला. त्यामुळे धोका पत्करून टोमॅटोचे पीक घेतलेल्या शेतकर्यासाठी हे वर्ष द्राक्षबागे पेक्षा अधिक उत्त्पन्न देणारे ठरले आहे.15 आॅगस्ट ते 19 आॅक्टोबर पर्यत पिंपळगांव बाजार समितीत 83 लाख 85 हजार टोमॅटो विक्रीसाठी आले.त्यातुन शेतकर्यांच्या पदरात 428 कोटी 37 लाख 69 हजाररूपये पडल्याने कष्टाचे चिज झालेआहे.

हेही वाचा > रहाडी, खरवंडीत चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्रीत सात ठिकाणी चोऱ्या बाजारसमितीचे सभापती दिलीप बनकर यांच्या नेटक्या नियोजनामुळे पिंपळगांव बाजार समितीही टोमॅटोची राजधानी बनली.आडतदारही परप्रातीय व्यापार्याशी व्यवहार करण्याचा धोका पत्करून कामकाजकरतात.यंदाचेवर्ष टोमॅटो उत्पादकांना आर्थिक आधार देणारे ठरलेआहे. - सोमनाथ निमसे (मातोश्री व्हेजीटेबल)

loading image
go to top