नाशिक जिल्ह्यात मृत्‍यूचे तांडव सुरुच; दिवसभरात 49 बाधितांचा मृत्यू

जिल्‍ह्यात कोरोनामुळे (Coronavirus) होणाऱ्या मृत्यूंची संख्या चिंताजनकरित्‍या वाढत असून, मृत्‍यूचे तांडव सुरुच आहे.
corona death
corona deathGoogle

नाशिक : जिल्‍ह्यात कोरोनामुळे (Coronavirus) होणाऱ्या मृत्यूंची संख्या चिंताजनकरित्‍या वाढत असून, मृत्‍यूचे तांडव सुरुच आहे. गुरुवारी (ता.6) जिल्‍ह्यात 49 बाधितांचा कोरोनाने बळी घेतला. यापैकी चाळीशीच्‍या आतील नऊ जणांचा समावेश आहे. दिवसभरात चार हजार 160 कोरोना बाधित आढळले असतांना, तीन हजार 782 रुग्‍ण कोरोनामुक्‍त झाले. यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण (Active Patients) संख्येत 329 ने वाढ झाली असून, सद्यस्‍थितीत जिल्‍ह्यात 34 हजार 166 बाधितांवर उपचार सुरु आहेत. (49 Corona Patients Died In Nashik District Marathi Corona Update News)



गुरुवारी झालेल्‍या 49 मृत्‍यूंपैकी नाशिक ग्रामीणमध्ये 23, नाशिक शहरात वीस बाधितांचा मृत्‍यू झाला आहे. मालेगाव महापालिका क्षेत्रातील सहा बाधितांचा कोरोनाने बळी घेतला. चिंताजनक बाब म्‍हणजे मृतांमध्ये चाळीशीच्‍या आतील नऊ बाधितांचा समावेश आहे. नाशिक शहरातील मखमलाबाद येथील 35 वर्षीय महिलेसह, अंबड परीसरातील 33 वर्षीय, नाशिक शहर परीसरातील 33 वर्षीय, अंबड लिंक रोड परीसरातील 32 वर्षीय, सातपूरमधील 31 वर्षीय युवकाचा मृत्‍यू झाला आहे. ग्रामीण भागात सिन्नरमधील 27 वर्षीय, दाभाडी (ता. मालेगाव) येथील 39 वर्षीय, खेडगाव (ता. दिंडोरी) येथील 38 वर्षीय, वडनेरभैरव (ता. चांदवड) येथील 28 वर्षीय युवकाचा कोरोनाने बळी घेतला आहे.

corona death
धक्कादायक! चांदवडला रेमडेसिव्हिर ऐवजी भुलेच्या इंजेक्शनची विक्री


दिवसभरात नाशिक महापालिका क्षेत्रात दोन हजार 487, नाशिक ग्रामीणमध्ये एक हजार 612, मालेगावला 18, जिल्‍हा बाहेरील 43 रुग्‍णांचा अहवाल पॉझिटिव्‍ह आला आहे. सायंकाळी उशीरापर्यंत सहा हजार 009 रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा होती. यात नाशिक ग्रामीणमधील सर्वाधिक चार हजार 105 अहवाल प्रलंबित आहेत. नाशिक शहरातील एक हजार 499, मालेगाव क्षेत्रातील 405 रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा होती. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात चार हजार 373 रुग्‍ण दाखल झाले. यापैकी नाशिक महापालिका क्षेत्रातील चार हजार 054 रुग्‍णांचा समावेश आहे. जिल्‍हा रुग्‍णालयात चार, डॉ.वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात सोळा रुग्‍ण दाखल झाले. नाशिक ग्रामीणमध्ये 243, मालेगाव क्षेत्रात 56 रुग्‍ण दाखल झाले आहेत.


मे महिन्‍यात 244 मृत्‍यू

(दिवसनिहाय तपशील असा)
दिनांक मृतांची संख्या

1 मे 38
2 मे 33
3 मे 32
4 मे 45
5 मे 47
6 मे 49

49 Corona Patients Died In Nashik District Marathi Corona Update News

corona death
नाशिकमध्ये ‘टॉसिलिझुब’ इंजेक्शनचा काळा बाजार! फार्मसीचे 2 विद्यार्थी ताब्यात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com