अवैधरित्या देशी विदेशी दारू विक्री करणारे 5 जण ताब्यात

illigal drink sale
illigal drink saleesakal

म्हसरूळ (जि.नाशिक) : पंचवटीतील आडगाव नाका परिसरात अवैधरित्या देशी विदेशी दारू (illigal drink sale) विकणारे पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या संशयीतांकडून दोन लाख पंचेचाळीस हजार सहाशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कामगिरी पंचवटी गुन्हे शोध (panchvati crime buero) पथकाने केली आहे.

अवैधरित्या दारू विक्री

याबाबत अधिक माहिती अशी की,नाशिक शहरात अवैद्य दारूची विक्री होत असल्याने त्यांचेवर कायदेशीर करण्याचें पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय, पोलीसउपायुक्त अमोल तांबे सहायक पोलिस आयुक्त सिताराम गायकवाड आदेश जारी केले होते. त्यानुसार पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी गुन्हे शोध कामकाज करत होते.गुरूवार (ता.१३) रोजी पोलिस नाईक रवी आढाव कर्तव्यावर असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, पंचवटी डेपो समोर काही संशयीत चारचाकी वाहनातून अवैधरित्या दारू विक्री करत आहेत. ही माहिती वरिष्ठांना कळविली.

illigal drink sale
मिरची कोणी फुकटही घेईना! शेतकऱ्याने उभ्या पिकावर फिरवला रोटर

पंचवटी गुन्हे शोध पथकाची कामगिरी

गस्तीवर असलेले गुन्हे शोध पथकाने पंचवटी डेपो समोरिल चव्हाण बॅटरी जवळील मोकळ्या जागेत ओमिनी कार क्रमांक एमएच १५ के ८०३८ मध्ये पाच संशयीत अवैधरित्या देशी विदेशी दारू विक्री करताना ताब्यात घेतलें. यात संशयीत मयुर साहेबराव बोधक (वय २९, मखमलाबाद रोड, पंचवटी) कपिल रोहीदास पगारे (वय २६, पंचवटी), दिपक बाळु पोतदार(वय २७रा. स्वामी नारायण मंदीर ट्रस्टच्या खोलीमध्ये चव्हाण नगर,आडगाव)प्रितम राजेंद्र चौधरी (वय ३०रा. रूषिराज प्राईड, बी.विंग, फ्लॅट नं.८, पाईप लाईनरोड, गंगापुररोड)रोहन सुरेश शिंदे( वय ३०रा. जय जलाराम सोसायटी , ट्रॅक्टर हाऊस, भद्रकाली)ताब्यात घेतले .या संशयितांकडून १,१५,२००रूपये किंमतीचे देशी दारूचे ४० बॉक्स,८५,४४० रूपये किंमतीचे विदेशी दारूचे१४ बॉक्स व त्यांचे ताब्यातील ४५,०००रूपये किंमतीची ओमीनी कारक्रमांक एमएच१५के८०३८ असा एकुण २,४५,६४० रुपये किंमतीचा मुदेमाल हस्तगत करण्यात आला

illigal drink sale
कोरोना उतरणीला मात्र इभ्रत टांगणीला! नाशिक मार्केट गर्दीचे फोटो देशभर VIRAL

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com