Rajya Natya Spardha | विठ्ठला नाटकाने वाजणार नाशिक केंद्रावर तिसरी घंटा

Drama
Dramaesakal

नाशिक : सलग ६० वर्षे अविरत नाट्यसेवा करणाऱ्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेने राज्याला अनेक दिग्गज रंगकर्मी, कलावंत दिले आहेत. कोरोनाकाळात याला ब्रेक लागला मात्र आता रंगभूमीवर तिसरी घंटा मोठ्या उत्साहात वाजत आहे. रंगकर्मींच्या उत्साहाला अधिक उधाण आणणारी ६१ व्या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेला गुरुवार (ता. १७)पासून सुरवात होत आहे. (61st Maharashtra State Amateur Drama Competition first play today Vithala Nashik Latest Marathi News)

Drama
Winter Skincare : हिवाळ्यासाठी खोबरेलतेल वरदान!; खोबरेलतेल ठेवते त्‍वचा मुलायम!

स्पर्धेची नांदी विठ्ठला या नाटकाने होत आहे. भूत हा प्रत्यक्षात दिसत नसतो. दिसायला काहीतरी कारण घडावे लागते तरीही भूत हा माणसांचा आवडता छंद राहिला आहे. प्रत्येक माणसाने आपल्याला सोयीने, कल्पनेने आपापले एक भूत निर्माण केले आहे. अशाच एका भुताची व नामा शिंपीची ही कथा. भूत पिंपळाच्या झाडावर बसून झोपडीतील नामाचे बोलणे ऐकतो, त्याला सतत बघतो व त्यातूनच दोघांचा व्यासंग घडतो. त्याचीच मनोरंजक व तापदायक गोष्ट म्हणजे विजय तेंडुलकर लिखित ‘विठ्ठला’ हे नाटक स्पर्धेत सादर होणार आहे. या नाटकाचे दिग्दर्शन राजेश शर्मा यांनी केले आहे.

यांचा सहभाग

नाटकाचे नेपथ्य- शैलेंद्र गौतम, प्रकाशयोजना- विनोद राठोड, संगीत- मधुरा तरटे, रंगभूषा- माणिक कानडे, वेशभूषा- संतोष झेंडे करणार आहेत.
कलावंत- भारतसिंह परदेशी, यशवंत भालेराव, अनिल वीरकर, अभिषेक विरकर, जॉकी ठाकरे, ललित बत्तासे, नंदू परदेशी, प्रियांका सिंग, स्वाती संगमनेरे, रेखा देशपांडे, निशा चव्हाण, नयना सनांसे, हिंदवी सनांसे, सम्राट सौंदाणकर, मयूर चोपडे, संजय गंगावणे.

Drama
Nashik : आला हिवाळा, जॉगिंगला चला..; पिंपळगावला मैदानावर नागरिकांची गर्दी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com