esakal | मालेगाव बाह्यसाठी साडेसात कोटी; कृषिमंत्री दादा भुसे यांची माहिती

बोलून बातमी शोधा

Dada Bhuse
मालेगाव बाह्यसाठी साडेसात कोटी; कृषिमंत्री दादा भुसे यांची माहिती
sakal_logo
By
प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : मालेगाव बाहयह्य मतदारसंघातील विविध गावांमध्ये विकासकामांसाठी ७ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यात जनसुविधा योजनेंतर्गत १ कोटी ३६ लाख, नागरी सुविधा योजनेंतर्गत ५५ लाख, यात्रास्थळ विकास योजनेंतर्गत ३२ लाख, अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तींचा विकासासाठी ५ कोटी ४२ लाख रुपयांच्या कामांचा समावेश असल्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी कळविले आहे.

जनसुविधा योजनेंतर्गत काष्टी, जळगाव (गा.) येथे ग्रामपंचायत इमारत बांधण्यासाठी २४ लाख मंजूर करण्यात आले आहेत. सावतावाडी, सायने खुर्द, वडेल, वाके, वळवाडी, अजंग, आघार खुर्द, दाभाडी, दहिकुटे, दसाणे, गाळणे, काष्टी, कौळाणे (गा.), लोणवाडे, लुल्ले, नांदगाव, निळगव्हाण, साजवहाळ, सवंदगाव येथील स्मशानभुमी कामांसाठी १ कोटी १२ लाख मंजूर करण्यात आले आहेत. नागरी सुविधा योजनेंतर्गत झोडगे, अजंग, वडेल, करंजगव्हाण, रावळगांव, सौंदाणे गावांसाठी गावअंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण करण्यासाठी ५५ लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला.

हेही वाचा: नाशिक जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ

तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत वडनेर खाकुर्डी येथील महादेव मंदिरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, पिंपळगाव येथील गंगासागर मंदिरापर्यंत रस्ता तयार करणे, करंजगव्हाण येथील विंध्यवासिनी देवी मंदिर येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, आघार येथील सिद्धेश्‍वर मंदिर परिसरातील सुधारणा करण्यासाठी ३२ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आले आहे. अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तींचा विकास करण्यासाठी विविध गावांमध्ये कामे केली जाणार आहेत. एकूण ७ कोटी ६५ लाखांच्या कामांमुळे नागरिकांना सुविधा उपलब्ध होणार आहेत.

हेही वाचा: मुंबईहून उत्तर प्रदेशात निघालेल्या तरुणांवर काळाचा घाला; चौघे जागीच ठार