
राज्यातील 328 आदर्श शाळा बांधकामासाठी 75 कोटी वितरित
नाशिक : राज्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक २६७, माध्यमिक व उच्च माध्यमिक ६१ अशा एकूण ३२८ आदर्श शाळांच्या मोठ्या बांधकामासाठी राज्य सरकारने ७५ कोटी २४ लाखांचा निधी वितरित केला आहे. त्यापैकी ५१ कोटी २४ लाख रुपयांमधून प्राथमिकच्या ५३, तर माध्यमिकच्या ५३ शाळांची मोठी बांधकामे करण्यासाठी २४ कोटी रुपये आहेत.
आदर्श शाळांच्या मोठ्या बांधकामासाठी नाशिक जिल्हा परिषदेच्या (zp) कळवणमधील मुलांची, साकोरा (ता. नांदगाव), पालखेड (ता. निफाड), वडांगळी (ता. सिन्नर) येथील शाळेचा समावेश करण्यात आला आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, पूर्वीच्या महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या ८१ शाळा, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, सरकारी विद्यानिकेतन, नागरी भागातील शाळा यांचा समावेश करून ४८८ शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याचा निर्णय ५ मार्च २०२१ ला घेण्यात आला आहे.
त्यापैकी प्राथमिक व उच्च प्राथमिक २९३, माध्यमिक व उच्च माध्यमिक ६२ अशा एकूण ३५५ शाळांच्या लहान बांधकामासाठी ५३ कोटी ९७ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.
हेही वाचा: आरटीई प्रवेशासाठी दोन वेळा मुदतवाढ देऊनही जागा भरेना
राज्यातील आदर्श शाळांपैकी प्राथमिक व उच्च प्राथमिक २६७, माध्यमिक व उच्च माध्यमिक ६१ अशा एकूण ३२८ शाळांच्या मोठ्या बांधकामासाठी निधी वितरित करण्याचे धोरण सरकारने स्वीकारलेले आहे. त्यापैकी १०६ शाळांना निधी देण्यात आला आहे.
हेही वाचा: व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया एकसारखी हवी
Web Title: 75 Crore Distributed For Construction Of 328 Model Schools In The State Nashik
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..