Workers
WorkersEsakal

Nashik News: रोजगार हमीवरील मजुरांची यंदाची दिवाळी अंधारात; मजुरीचे थकले 8 कोटी रुपये

Nashik News : सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरू असताना दुसरीकडे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील कामांवर काम करीत असलेल्या नाशिक जिल्ह्यातील मजुरांची दिवाळी अंधारात आहे.

जिल्ह्यातील मजुरांची आठ कोटी रुपयांची मजुरी दोन महिन्यांपासून थकली आहे. रोजगार हमीच्या कामांवर काम करीत असलेल्या मजुरांच्या खात्यात आठवडाभरात रक्कम जमा केली जात असताना केंद्र सरकारने सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन महिन्यांत मजुरांच्या खात्यात रक्कम जमा केलेली नाही. (8 crores of wages owed to laborers of rojgar hami yojana nashik news)

वर्षातील किमान १०० दिवस मजुरांना रोजगाराची हमी देणारा महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना कायदा केंद्र सरकारने केला आहे. यात मजुरांची ऑनलाइन हजेरी घेऊन दर आठवड्याला त्यांच्या कामाची रक्कम जमा केली जाते. ही रक्कम केंद्र सरकार थेट मजुराच्या खात्यात जमा करते.

रोजगार हमी मजुरांचे पैसे कधीही थांबविले जात नसल्याने रोजगार हमी योजनेविषयी मजुरांमध्ये एक विश्वास निर्माण झालेला आहे. मात्र, गत सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन महिन्यांचे रोजगार हमी मजुरांचे पैसे केंद्र सरकारने मजुरांच्या खात्यात वर्ग केले नाहीत. सुरवातीला संकेतस्थळावर काही समस्या असेल, असे गृहित धरले गेले. मात्र, आता दोन महिने उलटूनही मजुरांच्या खात्यात रक्कम वर्ग होत नसल्याने मजुरांना दिवाळी सणाच्या काळात उधार-उसनवार करण्याची नामुष्की ओढवली आहे.

रोजगार हमीवर इतर रोजंदारीच्या कामांपेक्षा कमी रक्कम मिळते. मात्र, वर्षभर काम तसेच प्रत्येक आठवड्याला मिळणारी मजुरी यामुळे मजूर रोजगार हमीला प्राधान्य दिले जाते. मात्र, आता दोन महिन्यांपासून रक्कम थकल्याने मजुरांचे हाल होत आहेत.

Workers
Nashik News: जलजीवन, बांधकामचे तीन दिवसांत 50 कोटींची बिले अदा

रोजगार हमी योजनेतून अनेक कुशल कामे जसे शिवार रस्ते, पाणंद रस्ते, सिमेंट बंधारे, वैयक्तिक लाभाच्या योजना आदी कामे केली जातात.

या कामांमध्ये ६० ते ९० टक्क्यांपर्यंत कुशल व उर्वरित अकुशल कामे केली जातात. त्यातील कुशल कामाची रक्कम राज्य सरकारकडून दिली जाते. जिल्ह्यातील कुशलच्या कामांचे १२.३७ कोटी रुपये दोन महिन्यांपासून थकीत आहेत. यामुळे योजनेतून केली जाणारी सर्वच कुशल, अकुशल कामे अडचणीत आली आहेत.

पैशांअभावी मजुरांनी फिरवली पाठ

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केल्या जात असलेल्या कामांचे पाच कोटी रुपये व उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून केल्या जात असलेल्या कामांचे तीन कोटी रुपये, असे जिल्ह्यातील सर्व रोजगार हमीच्या कामांवर काम करणाऱ्या सर्व मजुरांचे आठ कोटी रुपये दोन महिन्यांपासून थकले आहेत. यामुळे या विभागांनी मंजूर केलेल्या कामांवर आता मजूर मिळत नाहीत.

Workers
Farmer Protest: कर्ज वसुलीविरोधात नागपुरात अन्नत्याग आंदोलन; शेतकरी संघटना समन्वय समितीचा आक्रमक पवित्रा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com