Farmer Protest: कर्ज वसुलीविरोधात नागपुरात अन्नत्याग आंदोलन; शेतकरी संघटना समन्वय समितीचा आक्रमक पवित्रा

thousand brokers at MLA residence MLA own support common people are being cheated politics
thousand brokers at MLA residence MLA own support common people are being cheated politicsesakal

Farmer Protest : शेतकरी संघर्ष समिती, शेतकरी संघटना समन्वय समिती व आदिवासी संघर्ष समिती धनवान पार्टी यांच्यातर्फे १६१ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची राज्य व केंद्र सरकार यांनी दखल न घेतल्याने आक्रमक झालेले संघटना पदाधिकारी अन्नत्याग आंदोलन करणार आहेत.

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात १८ डिसेंबरपासून विधिमंडळासमोर अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे सुधाकर मोगल, भगवान बोराडे, कैलास बोरसे, दिलीप पाटील, धोंडिराम तैल आदींनी पत्रकार परिषदेत दिली. (hunger strike in Nagpur from December 18 against debt recovery nashik news)

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सक्तीची कर्जवसुली बंद करण्यासाठी तसेच सहकार कायदा १९६० चे कलम १०१, १०७ व १००, ८५ नुसार कारवाई सुरू आहे. ती तत्काळ बंद करावी व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, या मागणीसाठी १ जून २०२३ पासून जिल्हा रुग्णालयासमोर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची दखल न घेतल्याने मध्यंतरीच्या काळात अन्नत्याग आंदोलन काही शेतकऱ्यांनी केले होते.

तसेच, मुंबई येथे पावसाळी अधिवेशन काळात एक शिष्टमंडळ जाऊन विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, पालकमंत्री दादा भुसे, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्यासह विविध लोकप्रतिनिधींना निवेदन देऊन साकडे घातले.

thousand brokers at MLA residence MLA own support common people are being cheated politics
Nashik Leopard Attack: बिबट्याच्या हल्ल्यात 8 वर्षीय बालकाचा मृत्यु

मात्र, राज्य शासनाने दखल न घेतल्याने आदिवासी संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष कैलास बोरसे यांच्या नेतृत्वाने मुरलीधर दळवी, विलास कुवर, अशोक देशमुख, कांतिलाल भोये, धोंडिराम थैल यांच्या शिष्टमंडळाने दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्या कार्यालयात जाऊन निवेदन दिले.

परंतु, केंद्र सरकारनेही दखल घेतली नाही. त्यामुळे गत १६१ दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन शासनाने दखल न घेतल्याने त्यांचे लक्ष वेधण्यासाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात १८ डिसेंबरपासून अन्नत्याग आंदोलन विधान मंडळासमोर करण्याचा निर्णय घेतला आहे. ९३८ आदिवासी सहकारी संस्थेच्या कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आदिवासी विकास विभागाने त्याबाबत लक्ष न दिल्याने त्या विरोधातही आंदोलन केले जाणार असल्याचे आदिवासी संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष बोरसे यांनी या वेळी सांगितले.

thousand brokers at MLA residence MLA own support common people are being cheated politics
Nashik News: जलजीवन, बांधकामचे तीन दिवसांत 50 कोटींची बिले अदा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com