Sakal Exclusive : नाशिक जिल्ह्यात 8 लाख 60 हजार 258 निरक्षरांची नोंद

8 lakh 60 thousand 258 illiterate recorded in Nashik district news
8 lakh 60 thousand 258 illiterate recorded in Nashik district newsesakal

Sakal Exclusive : सर्वाधिक तरुणांचा देश म्हणून भारताची जगभरात ओळख आहे. मात्र, त्याच देशात पाच कोटींहून अधिक लोक निरक्षर असून, त्यात महाराष्ट्रातील पावणेदोन कोटी लोकांचा समावेश आहे.

त्या लोकांना आता काहीही करून २०२७ पर्यंत साक्षर केले जाणार आहे. राज्याच्या शिक्षण संचालनालयाच्या योजना विभागातर्फे जिल्हानिहाय जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार नाशिक जिल्ह्यात ८ लाख ६० हजार २५८ निरक्षरांची नोंद झाली आहे. (8 lakh 60 thousand 258 illiterate recorded in Nashik district news)

नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत यंदा १२ लाख ४० हजार निरक्षरांना साक्षर केले जाईल. नवसाक्षरांच्या शोध घेण्यासाठी व काटेकोट सर्वेक्षणासाठी प्रत्येक १० व्यक्तींसाठी एक स्वयंसेवक नेमला जाणार आहे. अंगणवाडीसेविकांपासून प्रत्येक महाविद्यालयातील विद्यार्थी, एनसीसी, नेहरू युवा केंद्रातील तरुणांना (किमान आठवी उत्तीर्ण) स्वयंसेवक म्हणून काम करता येणार आहे.

निरक्षरांमधील अनेकांना अक्षर ओळख नाही, पण मोबाईल हातळता येतो. त्यामुळे त्यांना मोबाईलवर ऑनलाईन शिक्षण दिले जाणार आहे. पहिल्यांदा १५ च्या पुढील वयोगटातील लोकांना साक्षर केले जाईल. महिला-मुली, अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी, अल्पसंख्याक, बांधकाम कामगार, मजुरांना प्राधान्याने साक्षर केले जाईल.

शाळा भरण्यापूर्वी एक तास व शाळा सुटल्यानंतर एक तास त्या निरक्षरांना जिल्हा परिषदांच्या शाळेत स्वयंसेवक शिकविणार आहेत. आपले सरकार सेवा केंद्रांवरही त्यांना मोफत अध्यापन दिले जाईल, असे आदेशात नमूद आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

8 lakh 60 thousand 258 illiterate recorded in Nashik district news
Sakal Exclusive : गर्भाशय मुखाचा कर्करोग उच्चाटनासाठी चळवळ! सर्वाईकल कॅन्‍सर प्रिव्‍हेन्‍शन फाउंडेशनची स्‍थापना

पुण्याच्या राज्य मुक्त विद्यालय मंडळातर्फे निरक्षरांच्या एका वर्षात दोन चाचण्या होतील. दिवाळीत पहिली स्तर मापन चाचणी, तर फेब्रुवारीत दुसरी चाचणी होईल. दोन्ही चाचण्या उत्तीर्ण होणाऱ्यांना पुढे पाचवी, आठवी, दहावी व बारावीच्या परीक्षेला बसता येणार आहे.

राज्यात एक कोटी ६३ लाख निरक्षर

राज्याच्या शिक्षण संचालनालयाच्या योजना विभागाने जिल्हानिहाय निरक्षरांची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार सद्य:स्थितीत राज्यात एक कोटी ६३ लाख निरक्षर आहेत .यात पुणे जिल्ह्यात १० लाख ६७ हजार ८२३ लोक निरक्षर असल्याची बाब समोर आली आहे. त्यापाठोपाठ नाशिक, सोलापूर, नगर, पालघर, जळगाव, मुंबई, नांदेड, ठाणे अशा नऊ जिल्ह्यांतच ७३ लाख ६१ लाख ४६० निरक्षर सापडले आहेत.

जिल्हानिहाय निरक्षरांची संख्या

नाशिक : ८ लाख ६० हजार २५८

जळगाव : ७ लाख ३४ हजार ३३५

नगर : ७ लाख ८४ हजार ३२४

पालघर : ६ लाख ८१ हजार ५७३

8 lakh 60 thousand 258 illiterate recorded in Nashik district news
Sakal Exclusive : ‘पीसीपीएनडीटी’ अंमलबजावणीत महाराष्ट्र ठरावा देशासाठी पथदर्शी : डॉ. समीर गांधी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com