Nashik Accident News : दिंडोरी रोडवरील अवधूतवाडी रस्त्यालगत अपघातात 8 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू

Accidental Vehicle & Late Joya Sheikh
Accidental Vehicle & Late Joya Sheikhesakal

Nashik News : आई-वडिलांसोबत किराणा दुकानात पायी जात असताना रस्ता ओलांडताना, मालवाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनाच्या धडकेत एका आठ वर्षीय बालिकेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता.०१) दिंडोरी रोडवरील पाटा जवळील एमएसईबी ऑफिस लगत घडली. (8 year old girl died on spot in accident near Awadhoowadi Road on Dindori Road Nashik News)

या घटनेनंतर संतप्त नागरिकांकडून छोटा हत्ती वाहनाची तोडफोड करण्यात आली तसेच वाहन चालकास मारहाण करण्यात आली. पंचवटी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. पोलिसांनी वाहन चालकास ताब्यात घेतले असून, याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जोया सलीम शेख (वय ८, राहणार, अवधुतवाडी, दिंडोरी रोड, पंचवटी) असे अपघातात मृत्यू झालेल्या बालिकेचे नाव आहे. सोमवारी (ता.०१) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास जोया आपले वडील सलीम शेख व आई शबनम यांच्यासोबत वज्रेश्वरी नगर येथील किराणा दुकानात दिंडोरी रोडवरून पायी जात होते.

पाटा जवळ असलेल्या एमएसईबी ऑफिस जवळून रस्ता ओलांडत असताना या सुमारास दिंडोरी नाक्याकडून तारवाला नगरच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या मालवाहतूक करणारा छोटा हत्ती वाहनाने (एमएच १५, एचएच ४८५८) धडक दिली. या धडकेत जोयाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Accidental Vehicle & Late Joya Sheikh
Pune Crime: पुणे हादरलं! नशा करणाऱ्यांना हटकल्याने कोयत्याने वार करत एकाची हत्या

यावेळी गंभीर जखमी झालेल्या जोयाला ऍम्ब्युलन्स मधून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी शबाना फिरोज खान यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

घटना घडताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत, पंचनामा करून पोलिसांनी संशयित वाहन चालकास ताब्यात घेतले.

याठिकाणी अपघातामुळे निर्माण झालेला तणाव शांत करीत जमावाला पांगवले. यावेळी वाहतूक कोंडी होऊन दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Accidental Vehicle & Late Joya Sheikh
Nashik Accident News : भाजीपाल्याची पिकअप उलटून शेतकरी जखमी; तिघे गंभीर

सर्वांची लाडकी होती जोया

जोया इयत्ता दुसरी मध्ये शिक्षण घेत होती. जोयाचे वडील सलीम शेख हातावर मोलमजुरी करणारे आहेत. शरदचंद्र पवार बाजार समितीत हमालीचे काम करून, आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात.

जोया अत्यंत गुणी व हुशार असल्याने परिसरात सर्वांचीच प्रिय होती. नात्यात लग्न सोहळा असल्याने बाहेरगावी गेलेली जोया दोन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये परतली असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. तिच्या अपघाती मृत्यूने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Accidental Vehicle & Late Joya Sheikh
Jalgaon Crime News : कामगारदिनीच कामगाराची आत्महत्या; कुटूंबीयांना घातपाताचा संशय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com