esakal | नाशिक : अकरावीचे आठ हजार ८९६ प्रवेश निश्‍चित; आजपासून दुसरी फेरी
sakal

बोलून बातमी शोधा

11th online admission

अकरावीचे आठ हजार ८९६ प्रवेश निश्‍चित; आजपासून दुसरी फेरी

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : वाढीव मुदतीनंतर अकरावी प्रवेशाच्‍या पहिल्या फेरीची प्रक्रिया मंगळवारी (ता. ३१) संपली. नाशिक महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांत राबविल्‍या जाणार या प्रक्रियेत आतापर्यंत आठ हजार ८९६ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चित केले. या फेरीची प्रक्रिया पूर्ण झाल्‍यानंतर १६ हजार ४८४ जागा रिक्‍त आहेत. दरम्‍यान, दुसऱ्या फेरीसाठी नव्‍याने नोंदणी आणि महाविद्यालय, शाखांचा पसंतीक्रम नोंदविण्यासाठी अर्जाचा भाग दोन भरणे किंवा त्‍यात दुरुस्‍तीची प्रक्रिया बुधवार (ता. १)पासून सुरू होईल. शनिवारी (ता. ४) दुसरी गुणवत्तायादी प्रसिद्ध होणार आहे.


नाशिक महापालिका क्षेत्रातील ६० कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावीच्‍या २५ हजार ३८० जागा उपलब्‍ध असून, प्रवेशाच्‍या पहिल्‍या फेरीला चांगला प्रतिसाद मिळाला. या फेरींतर्गत आठ हजार ८९६ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चित केले असून, यापैकी ५८६ विद्यार्थ्यांनी विविध कोट्यांतून प्रवेश मिळविले आहेत. इंग्रजी माध्यमाच्या सर्वाधिक पाच हजार ८८१ जागांवर प्रवेश झाले असून, त्‍यापाठोपाठ मराठी माध्यमाच्या दोन हजार ८५८ आणि ऊर्दू माध्यमाच्या १५७ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. प्रवेशित विद्यार्थ्यांमध्ये राज्‍य शिक्षण मंडळाचे आठ हजार १८३ विद्यार्थी आहेत, तर सीबीएसई बोर्डाच्‍या ३३१, आयसीएसई बोर्डाच्‍या ३६३ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चित केले. अन्‍य बोर्डाच्या १९ विद्यार्थ्यांनी प्रवेशप्रक्रिया पूर्ण केली.

हेही वाचा: रस्ता चुकल्याने गुजरातचे पर्यटक रात्रभर किल्ल्यावरच


दुसऱ्या फेरीची प्रक्रिया

अकरावी प्रवेशाची दुसरी फेरी बुधवारपासून सुरू होणार आहे. त्‍यानुसार यापूर्वी नोंदणी न केलेल्‍या विद्यार्थ्यांना नोंदणी प्रक्रिया राबविता येईल. तसेच अर्जाचा भाग दोन भरणे, दुरुस्‍ती करण्याची संधी असेल. त्‍यासाठी गुरुवारी (ता. २) रात्री आठपर्यंत मुदत असेल. माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी शुक्रवार (ता. ३) राखीव ठेवला आहे, तर शनिवारी (ता. ४) दुसरी गुणवत्तायादी प्रसिद्ध होईल. यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी सोमवार (ता. ६)पर्यंत मुदत असेल..

हेही वाचा: इगतपुरीचे भूमिपुत्र सैनिक सचिन चिकणे यांचे भोपाळ येथे निधन

loading image
go to top