इगतपुरीचे भूमिपुत्र सैनिक सचिन चिकणे यांचे भोपाळ येथे निधन

Sachin Chikane
Sachin ChikaneSakal

इगतपुरी शहर (जि. नाशिक) : देशाच्या संरक्षण क्षेत्रात कार्यरत असणारे इगतपुरी तालुक्यातील भूमिपुत्र सैनिक सचिन गणूजी चिकणे यांचे मंगळवार ता.३१ रोजी कर्तव्यावर असताना दुर्दैवी निधन झाले. भोपाळ येथे कर्तव्यावर असताना त्यांची अचानक तब्बेत खालावल्याने त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

इगतपुरी शहर आणि तालुक्यात याबाबत माहिती समजताच सगळीकडे शोककळा पसरली. गेल्या १५ वर्षांपासून सचिन चिकने सैन्यात कार्यरत आहेत. सुटीवर आल्यावर मनमोकळे पणाने ते मित्र आणि नागरिकांना देशसेवा ह्या विषयावर भरभरून बोलायचे. त्यांच्या अचानक जाण्याने खरा देशभक्त गमावला असल्याची प्रतिक्रिया सर्वत्र उमटली आहे. आज बुधवार (ता. १ रोजी) भोपाळहुन त्यांचे पार्थिव इगतपुरीत दाखल होणार आहे. शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर धम्मगिरी जवळ येथे अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती तहसीलदार परमेश्वर कासुळे दिली.

Sachin Chikane
रस्ता चुकल्याने गुजरातचे पर्यटक रात्रभर किल्ल्यावरच

इगतपुरी शहरातील सह्याद्रीनगर भागात असणारे कै गणूजी यांचा सचिन हा मुलगा असून त्यांना आई, एक भाऊ, एक बहिण, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. लहानपणापासून देशाची सेवा करण्यासाठी झपाटून प्रयत्न करून सचिन सैन्यात भरती झाला. सुटीवर आल्यावर गमतीजमती आणि देशाची सेवा ह्यावर तो मनमोकळेपणाने बोलायचा.त्याच्या विविध आठवणींनी संपूर्ण शहरात शोकग्रस्त वातावरण तयार झाले आहे. भोपाळ येथे कर्तव्यावर असतांना त्यांना त्रास होऊ लागल्याने लष्करी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

Sachin Chikane
नाशिक : विधानसभा सदस्य असल्याचे भासवणारा तोतया लोकसेवक गजाआड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com