Nashik News: बोरटेंभेत 9 म्हशींचा घटसर्प रोगाने मृत्यू

Death of buffalo file photo
Death of buffalo file photoesakal

Nashik News : बोरटेंभे (ता. इगतपुरी) येथील शेतकरी जयराम आडोळे यांच्या नऊ म्हशी घटसर्प रोगाने मृत्युमुखी पडल्या.

यामुळे शेतकऱ्याचे जवळपास दहा लाखांचे नुकसान झाले असून, पशुधन विकास अधिकाऱ्यांनी परिसरात जनावरांच्या लसीकरण मोहिमेला गती दिली आहे. (9 buffaloes died of Ghatasarp disease in Bortembh Nashik News)

याबाबत आमदार हिरामण खोसकर यांनी जिल्हा पशुधन विकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधून शेतकऱ्याला नुकसानभरपाई देण्याबाबत सांगितले. मात्र, जिल्हा पशुधन अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना जनावरांचे तातडीने विमा काढून घेण्याचे कळविले आहे.

घटसर्प हा दुधाळू जनावरांना होणारा रोग आहे. विशेषत: म्हशींमध्ये हा रोग जास्त प्रमाणात आढळतो. हा रोग ‘पाश्चुरेला मल्टोसिडा’ या विषाणूंमुळे होत असल्याचे इगतपुरी पंचायत समितीचे प्रभारी पशुधन विकास अधिकारी डॉ. हेमंत कुलकर्णी यांनी सांगितले.

या रोगामुळे जनावरास ताप येतो. घशास सूज येऊन श्वासोच्छवास जलद गतीने होतो. जनावरांचे डोळे लाल होऊन ते सतत वाहतात. जीभ बाहेर येते. नाकातून चिकट स्त्राव बाहेर पडतो व लाळ गळते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Death of buffalo file photo
Nashik Rain Crisis: पाऊस न झाल्यामुळे पिके करपली; सिन्नर तालुक्यात पशुधन विकण्याची बळीराजावर वेळ

काही जनावरांना काही वेळेस रक्ताची हागवण होते व अंगावर सूज येते, अशी लक्षणे दिसताच शेतकऱ्यांनी तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही डॉ. कुलकर्णी यांनी केले. मेमध्ये जनावरांना शेतकऱ्यांनी प्रतिबंधात्मक लसीकरण देणे गरजेचे आहे.

पंचायत समिती पशुधन विकास कार्यालयातर्फे पाच किलोमीटरच्या परिसरात प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू झाले आहे.

जनावरांचा गोठा स्वच्छ ठेवणे, चारा रासायनमुक्त देणे व अस्वस्थ जनावरांना शुद्ध हवेत इतर जनावरांपासून बाजूला बांधण्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्याला शासन स्तरावरून काही मदत मिळेल का, याबाबत माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.

Death of buffalo file photo
Nashik Rain Crisis: नांदगाव तालुका दुष्काळाच्या सावटाखाली; खरिपातील उत्पन्नात घट?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com