Dhol Tasha Mahotsav: शिवसेना, ऊर्जा प्रतिष्ठानतर्फे 9ला ढोल-ताशा महोत्सव! 4 सप्टेंबरपर्यंत नावनोंदणीचे आवाहन

Dhol Tasha Mahotsav
Dhol Tasha Mahotsavesakal

Dhol Tasha Mahotsav : दिवसागणिक क्रेझ प्राप्त होत असलेल्या ढोल-ताशा या पांरपरिक वाद्याच्या कलेला क्रीडाचे स्वरूप प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने तसेच नाशिकचा डंका जगभर गाजविणाऱ्या ‘नाशिक ढोल’चा सन्मान करण्यासाठी या वर्षीदेखील शिवसेना व ऊर्जा प्रतिष्ठानतर्फे ९ सप्टेंबरला नाशिक ढोल-ताशा महोत्सव होणार आहे. (9th Dhol Tasha Mahotsav by Shiv Sena Energy Foundation Call for Enrollment by September 4th nashik)

गोविंदनगर येथील ठक्कर डोम येथे नाशिककरांना ढोल-ताशा महोत्सवाच्या माध्यमातून अनोखी पर्वणी साधण्याची संधी मिळणार आहे.

पुरातन काळाशी नाते सांगणाऱ्या ढोल-ताशा, शंख-झांजा आणि ध्वजाशी घट्ट नाळ असणाऱ्या आपल्या ढोल-ताशा पथकांनी आपल्या वादनातून एका अर्थाने सांस्कृतिक ओळख निर्माण केली आहे.

अशा पथकांचे श्रीगणेश विसर्जन मिरवणूक आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीला लयबद्ध-तालबद्ध वादन ऐकणे ही एक पर्वणीच असते.

रुद्राक्षांपासून द्राक्षापर्यंत, मंदिरांचे शहरापासून ते पर्यटन शहरापर्यंत, गड किल्ल्यांपासून आयटी हबपर्यंत, चवदार मिसळपासून ते वाइन कॅपिटलपर्यंत नाशिक आज जगभरात नावलौकिक मिळवत आहे.

यात नाशिकचे आणखी एक महत्त्वाचे बलस्थान म्हणजे नाशिक ढोल. देशभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये नाशिक ढोलचा डंका गाजत आहे.

हेच बलस्थान लक्षात घेऊन नाशिक ढोलचा लौकिक अधिक जोमदारपणे पोचविण्यासाठी नाशिक ढोलच्या सन्मानार्थ महोत्सव होणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Dhol Tasha Mahotsav
Nashik ZP News: जिल्ह्यातील रस्त्यांची CEOकडून तपासणी; निकृष्ट दर्जाचे आढळल्यास ठेकेदाराला काळ्या यादीत टाकणार

स्पर्धक, मंडळांनी महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख व ऊर्जा युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय बोरस्ते यांनी केले आहे.

महोत्सवात तालबद्ध विशेष सादरीकरण करणाऱ्या ढोल पथकांना एक लाख अकरा हजार रुपये, ५१ हजार व ३१ हजार रुपये रोख बक्षिसे व सन्मानचिन्ह दिले जाणार आहे. ४ सप्टेंबरपर्यंत नावनोंदणीचे आवाहन करण्यात आले आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ढोल पथकांत किमान २५ ते ३० ढोल व सात ताशे, एक ढोल आणि शंख असावे. प्रत्येक पथकास सादरीकरणासाठी १२ मिनिटे वेळेचे बंधन आहे.

प्रसन्ना तांबट (९८२३५५४५२०) किंवा शिवसेना कार्यालय (७०२०८४०८६९) येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Dhol Tasha Mahotsav
Ganeshotsav 2023: बाप्पाच्या आगमनासाठी मंडळांची जय्यत तयारी! नाशिककरांना मिरवणुकीत मिळणार वेगळी अनूभूती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com