esakal | लसीकरण कामासाठी मोबदला आशा व गटप्रवर्तक महिलांना किती देणार, हे अजूनही शासनाने घोषित केलेले नाही.

बोलून बातमी शोधा

Ashaworkers
लसीकरण कामाच्या मोबादल्यासाठी आशा, गटप्रवर्तक महिलांचा आंदोलनाचा इशारा
sakal_logo
By
कुणाल संत

नाशिक : प्रतिबंधक लसीकरण कामाचा मोबदला न देता आशा व गटप्रवर्तक महिलांकडून काम करून घेतले जात आहे. त्यामुळे या कामाचा मोबादला देण्यात यावा, अशी मागणी आयटक संलग्न आशा व गटप्रवर्तक महिलांनी केली आहे. याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांना निवेदनही देण्यात आले.

मोबदला आधीच तुटपुंजा, त्यातही वेळेवर मिळेना

लसीकरणामध्ये सुद्धा आशा व गटप्रवर्तक महिलांना सक्तीने काम करण्यास सांगितले जात आहे. आणि काम करून घेतले जात आहे. परंतु या लसीकरण कामासाठी मोबदला आशा व गटप्रवर्तक महिलांना किती देणार, हे अजूनही शासनाने घोषित केलेले नाही. त्यांच्याकडून हे काम विनामोबदला देत करून घेतले जात आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानकडून आशा महिलांना दरमहा एक हजार रुपये व गटप्रवर्तक महिलांना दरमहा पाचशे रुपये दिला जातो. असा तुटपुंजा मोबदला सुद्धा मागील चार महिन्यापासून या महिलांना मिळालेला नाही.

हेही वाचा: मेडिकल कचरा ठरतोय कोरोना स्प्रेडर्स; पैसे वाचविण्यासाठी घंटागाडीतून वाहतूक

संघटनेतर्फे तीव्र आंदोलनाचा इशारा

नाशिक जिल्ह्यात ग्रामपंचायत मार्फत एक हजार देण्याचे आदेश द्यावे, कोरोना प्रतिबंधक समिती गावपातळीवर निर्माण करावी, फक्त आशाच नाहीचतर इतरांना देखील कोरोना कामात समावेश करावा. आशा व गट प्रवर्तक ना पुरेसे सॅनिटायझर व हॅन्ड ग्लोज , संरक्षणात्मक किट उपलब्ध करून घ्या अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली असून जर या मागणींचा विचार झाला नाही तर आशा व गटप्रवर्तक संघटनातर्फे तीव्र आंदोलन करतील असा इशारा आयटक संलग्न आशा व गट प्रवर्तक संघटना वतीने देण्यात आला. आहे.

हेही वाचा: कोरोनाच्या निगेटिव्ह पोस्ट नकोच! मानसोपचारतज्ज्ञ सांगताएत...