

Abhijit Dipke
sakal
नाशिक : आदिवासी वसतिगृहातील असुविधांच्या विरोधात गेल्या १२ दिवसांपासून नाशिकमध्ये सुरू असलेले उपोषण स्थगित करून युवकांनी आंदोलन चालू ठेवावे. या आंदोलनाची व्याप्ती राज्यभरात वाढवून आपण दिल्लीतील जंतरमंतरप्रमाणे सकल आदिवासींचा मोर्चा थेट मुंबईला घेऊन जावू आणि आदिवासी विकासमंत्र्यांना राजीनामा द्यायला भाग पाडू, असा इशारा देत कॉक्रोज जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके यांनी गुरुवारी आदिवासी युवकांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला.