esakal | अभोणा : अतिवृष्टीमुळे कांद्याचे नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik

अभोणा : अतिवृष्टीमुळे कांद्याचे नुकसान

sakal_logo
By
किरण सूर्यवंशी

अभोणा : गेल्या एक - दोन आठवड्यापासून जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टीमुळे शेतमालाचे व साठविलेल्या कांद्याचे प्रचंड नुकसान झाले. येथील परिसरात शेतात काढणीला आलेले सोयाबीन, मका व आद्रतेमुळे चाळीत साठविलेला कांदा सडला आहे. काही कांद्याला डिर फुटले आहेत. दुसरीकडे कांदा लागवडीसाठी टाकलेल्या रोपांची पाऊस आणि पुरपाण्यामुळे नासाडी झाली असून, शेतकऱ्यांनी केलेली मेहनत व खर्च वाया गेला आहे.

चाळीत बऱ्यापैकी शिल्लक असलेल्या ३५ टक्के कांद्यावरच कशीबशी पुढील हंगामाची तयारी करावी लागणार आहे. अशा परिस्थितीत शिल्लक कांद्याला बऱ्यापैकी भाव मिळताच जोरदार चर्चा होते. वास्तवात कांदा लागवडीपासून ते माल विक्रीपर्यंत एकरी जवळपास ८५ हजार खर्च येतो. एकरी अंदाजे १६० ते १७० क्विंटल उत्पादन होते. म्हणजेच प्रत्येक क्विंटलला ४९६ रुपये इतका खर्च येतो. यात पाच महिन्यात साठविलेल्या कांद्याची वजनातील ३० टक्के घट व नैसर्गिक आपत्ती, आद्रतेमुळे ७० टक्क्यांपैकी ३५ टक्के नुकसान होते. त्यामुळे मिळणारा भाव जास्त वाटत असला तरी वास्तवात ३० ते ३५ टक्केच कांद्याची विक्री होणार, हे वास्तव सर्वसामान्यांनी लक्षात घेऊन सर्वांनी सहकार्य करावे, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा: एकाच वर्षात सोयाबीन बियाणे दर्जेदार!

असा होतो खर्च

रोपवाटीका बियाणे : १२ हजार

जमीन तयार करणे : दोन हजार

रासायनिक खत : एक हजार ५००

तणनाशक : ४००

निंदणी : एक हजार

फवारणी : ५००

एकूण खर्च : १७ हजार ४००

हेही वाचा: नवरात्रीमध्ये तयार होताना ऐनवेळी गडबड नकोय; मग या टिप्स करा फॉलो

पुनर्लागवड खर्च

जमीन तयार करणे : चार हजार

शेणखत : १२ हजार

बेसल डोस : पाच हजार

वाफे तयार करणे : दोन हजार

लागवड मजुरी : दहा हजार

मजूर गाडी भाडे : १५००

तणनाशक : ९००

फवारणी मजुरी : ६००

युरिया : ३५०

निंदणी : तीन हजार

रासायनिक औषेधे : पाच हजार

फवारणी मजुरी : ६००

पाणी भरणे मजुरी : सहा हजार

एकूण खर्च : ५० हजार ०५०

हेही वाचा: भुईमूग काढणी..वातावरणातील बदलाने उत्‍पन्नात घट

काढणी खर्च

मजुरी : दहा हजार

गाडी भाडे : १५००

ट्रॅक्टर वाहतूक : १५००

चाळ भराई : तीन हजार

मजूर चहापान, नाश्ता : एक हजार

एकूण खर्च : १७ हजार

हेही वाचा: नाशिक : उन्हाळ कांद्याच्या बाजारभावात वाढ

कांद्याच्या वाढत्या दराचा सर्वत्र चर्चेचा विषय होतो. मात्र, खते, रासायनिक औषधे, बियाण्यांचे वाढलेले भाव, त्यात मजुरीसाठी होणारा खर्च आणि बाजारपेठेत शेतमालाला मिळणारा भाव, यामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडतो. त्यात अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक संकटांनी तो अधिक रसातळाला जातो. अडचणीच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे.

- पंडित वाघ, कांदा उत्पादक, बार्डे (ता. कळवण)

loading image
go to top