esakal | ईद-ए-मिलादच्या तयारीला वेग! आकर्षक रोषणाई, समाजबांधवांमध्ये उत्साह 
sakal

बोलून बातमी शोधा

eid tayari.jpg

इस्लाम धर्मप्रेषित हजरत मोहमंद पैगंबर यांची जयंती (ईद-ए-मिलाद) शुक्रवारी (ता. ३०) होणार आहे. त्यामुळे मुस्लिम बांधवांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. त्यानिमित्ताने ईद तयारीस वेग आला आहे. धार्मिक स्थळांवर आकर्षक रोषणाई केली जात आहे.

ईद-ए-मिलादच्या तयारीला वेग! आकर्षक रोषणाई, समाजबांधवांमध्ये उत्साह 

sakal_logo
By
युनूस शेख

जुने नाशिक : इस्लाम धर्मप्रेषित हजरत मोहमंद पैगंबर यांची जयंती (ईद-ए-मिलाद) शुक्रवारी (ता. ३०) होणार आहे. त्यामुळे मुस्लिम बांधवांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. त्यानिमित्ताने ईद तयारीस वेग आला आहे. धार्मिक स्थळांवर आकर्षक रोषणाई केली जात आहे. रविवारी (ता. १८) रबीउल अव्वल महिन्याचे चंद्रदर्शन घडताच सोशल मीडियावर शुभेच्छा वर्षावासह विविध प्रकारचे धार्मिक संदेश प्रसारित करण्याची धूम सुरू आहे. 

अवघ्या पाच दिवसांवर ईद येऊन ठेपल्याने तयारीस वेग
इस्लामी वर्षाच्या रबीउल अव्वल महिन्याच्या ऊर्दू १२ तारखेस मुस्लिम बांधवांकडून पैगंबर जयंती अर्थात, ईद-ए-मिलाद साजरी केली जाते. शुक्रवारी (ता. ३०) ऊर्दू १२ तारीख येत असल्याने त्यादिवशी मुस्लिम बांधव ईद-ए-मिलाद साजरी करणार आहे. अवघ्या पाच दिवसांवर ईद येऊन ठेपल्याने विविध प्रकारच्या तयारीस वेग आला आहे. मशिद, दर्ग्यावर आकर्षक रोषणाई करण्यात येत आहे. घरोघरी विविध धार्मिक कार्यक्रम होत असल्याने घराची स्वच्छता, रंगरंगोटी करणे, सजावट करण्यासारखी कामे केली जात आहे. त्याचप्रमाणे हजरत पैगंबर यानी दिलेल्या शिकवणीच्या आधारावर मौलवी आणि धर्मगुरूंकडून फेसबुक आणि यू-ट्यूबच्या माध्यमातून ऑनलाइन धार्मिक प्रवचन सुरू आहे. घरोघरी कुराण ख्वॉनी केली जात आहे. 
जयंतीनिमित्त जुने नाशिक, वडाळागावातून जुलूस काढला जातो. शेकडो भाविक जुलूसमध्ये सहभागी होत असतात. यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावमुळे जुलूस काढण्यात येणार की नाही, हे अजून निश्‍चित नाही. तरीदेखील परंपरेनुसार पारंपरिक जुलूस मार्गावर रोषणाई करणे, हिरवे झेंडे, पताकासह विविध साहित्यांच्या माध्यमातून सजावट केली जात आहे. 

हेही वाचा >  पिंपळगावच्या टोमॅटोचा देशभरात डंका! सव्वाचारशे कोटी शेतकऱ्यांच्या पदरात 

शांतता समितीची बैठक 
भद्रकाली पोलिस ठाण्यात शनिवारी (ता. २४) सायंकाळी ईद-ए-मिलादनिमित्त शांतता समितीची बैठक झाली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रमजान आणि बकरी ईदप्रमाणेच ईद-ए-मिलाद शांतेत तसेच साध्या पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे सरकारने घालून दिलेल्या नियमांचे काठेकोर पालन करावे. दरम्यान, मुस्लिम बांधवांच्या सूचनाही या वेळी पोलिस अधिकाऱ्यांकडून जाणून घेण्यात आल्या.  

हेही वाचा > हाऊज द जोश! पाकिस्तानला धूळ चारणारा रणगाडा नाशकात दाखल

संपादन - ज्योती देवरे

loading image
go to top