Nashik Crime News: महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला जन्मठेप

पॅरोलवर सुटलेल्या आरोपीने केले होते कृत्य
Lifetime imprisonment
Lifetime imprisonment esakal

नाशिक : सिडकोतील पवननगर येथे खुनाच्या गुन्ह्यात कारागृहातून पॅरोल मिळताच ब्युटीपार्लरमध्ये घुसून महिलेस चाकूचा धाक दाखवून बलात्कार करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला नाशिक जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. (Accused who on parol raped woman gets life imprisonment Nashik Crime News)

नितीन सुभाष पवार (३३, रा. श्रीराम नगर, पवननगर, सिडको) असे आरोपीचे नाव आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये सिडकोतील रामनगरात ही घटना घडली होती. आरोपी पवार यास गुन्हे शाखेने अटक केली होती. त्यानंतर तो सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना कारागृह पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला होता.

मात्र, सरकारवाडा पोलिसांनी त्याला दुसऱ्याच दिवशी सिव्हीलमधील एका बाथरुममधून जेरबंद केले होते. दरम्यान, २७ सप्टेंबर २०२१ रोजी सयंकाळी सहा ते सात वाजेच्या सुमारास पवार याने पवननगर परिसरातील ब्युटीपार्लरमध्ये शिरुन महिलेला चाकूचा धाक दाखवून बलात्कार केला होता.

हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

Lifetime imprisonment
Sangli Crime News : माजी नगरसेवक हत्या प्रकरणी चौघांना अटक; भाजप नेताच निघाला मुख्य सुत्रधार

या गुन्ह्याचा पोलीस उपनिरीक्षक यू. आर. सोनवणे यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोप दाखल केले होते. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. एस. खरात यांच्यासमोर खटला चालला.

फिर्यादी, साक्षीदार, पंचांची साक्ष व परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून बलात्काराच्या गुन्ह्यात न्यायालयाने आरोपी पवार यास जन्मठेप व दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने कारावासाची शिक्षा ठोठावली.

खटल्यात सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता अपर्णा पाटील, एस. एस. गोरे यांनी युक्तिवाद केला. तर पैरवी अधिकारी म्हणुन सी. एम. सुळे, पी. व्ही. पाटील यांनी पाठपुरावा केला.

Lifetime imprisonment
Nashik Crime News : गोळीबाराच्या अडीच महिन्यात 3 घटना! शहरवासीयांत भीती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com