Nashik Crime News: उंटाची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई; मालेगाव तालुका पोलिसांकडून 43 उंट ताब्यात

While inspecting the camels, Veterinary Officer Dr. Javed Khatik
While inspecting the camels, Veterinary Officer Dr. Javed Khatikesakal

Nashik Crime News : राजस्थानहून अहमदनगरकडे ४३ उंट घेऊन जाणाऱ्या आठ जणांना मालेगाव तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तालुक्यातील पाडळदे गावाजवळील कळवाडी रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली.

एवढ्या मोठ्या प्रमाणावर उंट जप्त करण्याची ही पहिलीच कारवाई आहे. पायी चालत नेण्यात येणारे उंट कोठे व कोणाला विकले जाणार होते याचा उलगडा तपासात होणार आहे.

दरम्यान तालुका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उंटांची वैद्यकीय तपासणी करुन त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले. (Action against illegal camel transporters Malegaon taluka police seized 43 camels Nashik Crime News)

तालुक्यातील पाडळदे शिवारातून मोठ्या प्रमाणावर उंट जात असल्याची माहिती तालुका पोलिसांना सोमवारी (ता.८) सकाळी मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या भागात शोध मोहीम सुरु करत अवैधरीत्या उंट वाहतूक करणाऱ्या गफूर मेहताब सैय्यद (वय ३८),

बन्सी गुलाब सैय्यद (वय २८), सुलतान अब्दुल सैय्यद (वय २२), सुलतान गफूर सैय्यद (२३), अब्दुल करीम सैय्यद (४९) (वरील राहणारे सुपा, ता. पारनेर जि.नगर), सिकंदर गुलाब सैय्यद (४०) मुबारक गुलाब सैय्यद, (३२), लुकमान गुलाब सैय्यद (२३) (तिन्ही रा. वाळकी, जि. नगर) या आठ जणांना ताब्यात घेतले.

तसेच सर्व ४३ उंट तालुका पोलिस ठाण्याच्या आवारात आणण्यात आले. पोलिसांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून उंटांची तपासणी केली. सदर उंट राजस्थान येथून आणण्यात आले. ते ग्रामीण भागातून अहमदनगरकडे घेऊन जात असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी सुमारे २ लाख ८० हजाराचे ४३ उंट जप्त केले आहेत. उंटांना निळगव्हाण येथील पंजरापोळमध्ये पाठविले जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

While inspecting the camels, Veterinary Officer Dr. Javed Khatik
Nashik News: नवीन प्रशासकीय इमारतीस ऑक्टोबरची डेडलाईन! दादा भुसे यांच्याकडून कामाची पाहणी

नाशिक शहरासह जिल्हयात उंट तस्करीची पोलिसांनी केलेली ही दुसरी कारवाई आहे. सदर उंट कुठे व कशासाठी जात होते याचा तपास पोलिस करणार आहेत. सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, अक्षय पाटील, शशिकांत शिरोळे, पोलिस नाईक दीपक फुलमाळी आदींनी ही कारवाई केली. अक्षय पाटील यांच्या तक्रारीवरून तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

उंटांना अशक्तपणा

राजस्थानहून गेल्या अनेक दिवसांपासून उंट पायी आणले जात होते. कडक उन्हात चालल्यामुळे त्यांच्या पायांना जखमा झाल्या आहेत. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी चार उंटांवर उपचार केले.

पुरेसे अन्न न मिळाल्याने व सातत्याने पायी प्रवास असल्याने उंटांना अशक्तपणा व प्रचंड थकवा आल्याचे सांगण्यात आले. यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या उंटांना पाहण्यासाठी परिसरातील नागरिक गर्दी करत आहे.

While inspecting the camels, Veterinary Officer Dr. Javed Khatik
ZP Teacher Transfer: जिल्ह्यातील 270 शिक्षकांना बदल्यांपासून तूर्त अभय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com