esakal | कोविड सेंटरमध्ये नातेवाईक गेल्यास पोलिसांकडून कारवाई; महापालिकेचे पत्र

बोलून बातमी शोधा

covid center

कोविड सेंटरमध्ये नातेवाईक गेल्यास पोलिसांकडून कारवाई; महापालिकेचे पत्र

sakal_logo
By
.युनूस शेख

नाशिक : कोविड सेंटरमध्ये (covid center) उपचार घेत असलेले रुग्णांचे नातेवाईक सेंटरमध्ये जबरदस्ती प्रवेश करत असतात. कुठल्या ना कुठल्या कारणाने दिवसभर त्यांचा रुग्णालयात वावर असतो, असे नातेवाईक सुपरस्प्रेडर (super spreader) ठरण्याची शक्यता आहे. ते बाहेर निघून इतरांना संसर्ग होऊ शकतो, असे होऊ नये यासाठी महापालिका आयुक्त (Nashik Muncipal Corporation) कैलास जाधव यांनी सेंटरमध्ये नातेवाइकांना प्रवेशबंदी केली आहे. तरीदेखील अनेक सेंटरमध्ये नातेवाइकांचा वावर असल्याचे दिसून आले आहे. त्यास लगाम लागण्यासाठी जाधव यांनी विभागीय कार्यालयामार्फत कोविड सेंटर असणाऱ्या संबंधित पोलिस ठाण्यात (police action) अशा नातेवाइकांवर कारवाई करण्याचे पत्र दिले आहे.( (police action on relatives go to Covid Center)

हेही वाचा: ''चमकोगिरी करणाऱ्या भाजपने समाजसेवा शिकवू नये'',शिवसेना, राष्ट्रवादीचा भाजपवर पलटवार!

महापालिकेचे पत्र

पोलिस निरीक्षकांनी त्यांच्या मार्गदर्शनात अशा कोविड सेंटरमध्ये पोलिस कर्मचारी नियुक्ती करून रुग्णालयात वावर असणाऱ्या लोकांवर कारवाई करत त्यांना एक हजार रुपयांचा दंड करण्यात यावा. दंड न भरल्यास त्यांच्यावर संबंधित रुग्णालयाचे सुरक्षारक्षक यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा सूचना दिल्या आहेत. अशा आशयाचे पत्र महापालिका पश्चिम विभागीय कार्यालयाकडून भद्रकाली पोलिस ठाण्यास देण्यात आले आहे. डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय भद्रकाली पोलिस ठाण्यांतर्गत येत असल्याने त्यांना पत्र देऊन कारवाई करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे आरटीपीसी चाचणी लसीकरण यास होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी रुग्णालय आवारात बॅरिकेडिंग करण्यात यावे. त्या ठिकाणी पोलिस नियुक्त करण्यात यावा. तसेच केलेल्या कारवाईचा अहवाल वरिष्ठांना सादर करण्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा: VIDEO : नाशिकमध्ये 'म्‍युकोरमायकोसिस'चे नवे संकट; मधूमेह बाधितांना सावधगिरीचा इशारा

अधिकारी, कर्मचाऱ्यांवरही कारवाई

कोविड सेंटरमध्ये रुग्णाच्या नातेवाइकांना येण्यास बंदी आहे, असे असताना नातेवाइकांना सेंटरमध्ये प्रवेश देण्यास अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश असेल, तर त्यांच्यावरदेखील कारवाई करत त्यांचा अहवाल संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे देण्याच्या सूचना पत्रात नमूद केल्या आहेत.कोविड सेंटरमध्ये नातेवाईक गेल्यास पोलिसांकडून कारवाई : महापालिकेचे पत्र