esakal | धक्कादायक! नशेचे रॅकेट आजही कायम...पोलीसांच्या हुक्का पार्लर छाप्यात खळबळजनक गोष्टींचा खुलासा
sakal

बोलून बातमी शोधा

hukka.jpg

शहरात चोरी-छुपे हुक्का पार्लर चालू असल्याने तरूण महाविद्यालयीन मुले-मुली हुक्का पार्लरच्या आहारी जात असल्याची तक्रारी शहर पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी हुक्का पार्लरचा शोध सुरू केला. त्यावेळी अनेक गोष्टींचा खुलासा पोलीसांनी केला.

धक्कादायक! नशेचे रॅकेट आजही कायम...पोलीसांच्या हुक्का पार्लर छाप्यात खळबळजनक गोष्टींचा खुलासा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहरात चोरी-छुपे हुक्का पार्लर चालू असल्याने तरूण महाविद्यालयीन मुले-मुली हुक्का पार्लरच्या आहारी जात असल्याची तक्रारी शहर पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी हुक्का पार्लरचा शोध सुरू केला. त्यावेळी अनेक गोष्टींचा खुलासा पोलीसांनी केला

असा घडला प्रकार

शहरातील मध्यवर्ती ठिकाणांवर सुरू असणाऱ्या हुक्का पार्लर्समुळे महाविद्यालयीन विद्यार्थीदेखील सहज या ठिकाणांवर पोहोचू शकतात. चोरून लपून हा हुक्का पार्लर चालू असल्याने तरूण मुले-मुली हुक्का पार्लरच्या आहारी जात असल्याची तक्रारी नाशिक शहर पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी हुक्का पार्लरचा शोध सुरू केला. साईनाथ चौफुलीजवळ तिसर्‍या मजल्यावर अजिज मेन्सन कॅफे आहे. या ठिकाणी अल्ताफ ईस्माईल सैयद व शाहीद दस्तगीर खान हे अजिज मेन्शन कॅफेमध्ये हुक्का पार्लर चालवत आहेत. हुत्यानुसार पथकाने रविवारी (दि.२) रात्री ८.३० वाजेदरम्यान अजिज मेन्शन कॅफेमध्ये छापा टाकला.

विविध गोष्टींचा खुलासा

यावेळी कॅफेमालकाने विनापरवानगी हुक्का कॅफे सुरू ठेवला. बंदी असलेले सुगंधी तंबाखूजन्य पदार्थ व हुक्का पिण्याचे साहित्य सेवनकरीता उपलब्ध करून देताना मिळून आला. पथकाने मालकासह १८ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून हुक्का पार्लरचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. हुक्कामध्ये निकोटीन व तंबाखूजन्य पदार्थांचा वापर होत असल्याची माहिती मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकास मिळाली.

नशेचे रॅकेट आजही कायम

नाशिक शहर पोलिसांनी रविवारी (दि.२) रात्री हुक्का पार्लरवर छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी मालकासह १८ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून हुक्का पार्लरचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी मालक अल्ताफ ईस्माईल सैयद, शाहीद दस्तगीर खानसह १६ जणांविरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानिमित्ताने अनेक वर्षांपासून सुरू असलेले नशेचे रॅकेट आजही कायम असल्याचे चित्र पुन्हा एकदा उघडकीस आले आहे.

हेही वाचा > अमानुष! रक्ताच्या थारोळ्यात घरात पडलेली पत्नी..बाहेरून दरवाजा लावून निर्दयी पती फरार ..थरारक घटना

या प्रश्नाकडे कानाडोळा

शहरातील मध्यवर्ती ठिकाणांवर सुरू असणाऱ्या हुक्का पार्लर्समुळे महाविद्यालयीन विद्यार्थीदेखील सहज या ठिकाणांवर पोहोचू शकतात. या हुक्का पार्लरबद्दल पोलिस प्रशासनाकडे कोणत्याही प्रकारची नियमावली नाही. हुक्का पार्लर नक्की शहरापासून किती अंतरावर असावेत, त्यांची वयोमर्यादा किती असावी, येथे मद्यविक्री करण्यास बंदी आहे की नाही? या प्रकारचे अनेक प्रश्न उपस्थित होतात. शहरात ज्या ठिकाणी हुक्का पार्लर आहेत, त्या ठिकाणी मद्यविक्रीदेखील केली जाते. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे वयाचे पुरावे तपासले जात नाहीत. त्यामुळे या प्रश्नाकडे कानाडोळा केला जात असल्याचे चित्र पहायला मिळते.

हेही वाचा > सहा फुटांच्या खड्ड्यातून आली दुर्गंधी.. गावकऱ्यांना भलताच संशय....शोध घेताच गावात एकच खळबळ

loading image
go to top