Nashik News : जिल्ह्यातील 8 ग्रामसेवकांवर कारवाईचा बडगा

suspension
suspensionesakal

Nashik News : ग्रामपंचायतींच्या खात्यावर ‌थेट निधी वितरित केला जात असल्यामुळे पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून ग्रामसेवकांकडून मोठया प्रमाणात भ्रष्टाचार केला जात असल्याच्या तक्रारी प्रशासनाला प्राप्त होत आहेत.

अशाच तक्रारींच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी चौकशीअंती जिल्ह्यातील आठ ग्रामसेवकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. (Action taken against 8 village servants in district Nashik News)

यात तीन ग्रामसेवक निलंबित, तीन बडतर्फ तर दोन कंत्राटी ग्रामसेवकांची सेवा समाप्ताची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. राज्य व केंद्र सरकारकडून मिळणारा निधी आता थेट ग्रामपंचायतींच्या खात्यावर वर्ग केला जात आहे.

या निधीतून गावांचा विकास व्हावा, हा हेतू असला तरी अनेक ग्रामपंचायतीतील ग्रामसेवक सरपंचांसह पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून स्व:विकास साधत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांकडून सातत्याने केल्या जात आहे.

दुरुस्तीची कामे न करताच बिले काढणे, मर्जीतील लोकांना कामे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, नोंदवह्या १ ते ३३ नोंदी अपूर्ण असणे आदी तक्रारी ग्रामसेवकांच्या प्राप्त झाल्या होत्या. या अनुषगांने सुमारे १६ ग्रामसेवसकांची चौकशी करून त्यांची सुनावणी मुख्यकार्यकारी अधिकारी मित्तल यांच्याकडे झाली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

suspension
Police Transfer: राज्यातील साडेचारशे पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; आयुक्तालयात 16, ग्रामीणमध्ये 9 नवीन अधिकारी

यात ८ ग्रामसेवकांवर विविध प्रकारचे ठपके ठेवून अनेकांचे निलंबन कारवाईचे आदेश देण्यात आले आहे. कामात अनियमितता करतानाच विविध आरोपांवरून आठ ग्रामसेवकांवर ही कारवाई करण्यात आली आहे.

सुनावणी होऊन पाच दिवसांचा कालावधी उलटला आहे. मात्र, अद्याप त्यांचे निलंबन आदेश काढण्यात आलेले नसून दोन दिवसांत निलंबन, सेवा समाप्तीचे आदेश काढले जातील अशी माहिती ग्रामपंचायतींचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली.

suspension
Sinnar Chemical Fire Case: सिन्नर रस्त्यावरील आग घटनास्थळाची प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्यांकडून पाहणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com