Sinnar Chemical Fire Case: सिन्नर रस्त्यावरील आग घटनास्थळाची प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्यांकडून पाहणी

Sinnar Chemical Fire Case
Sinnar Chemical Fire Caseesakal

Sinnar Chemical Fire Case : सिन्नर- शिर्डी रस्त्यावरील वावी पांगरी परीसरातील नाल्यात अनधिकृत व बेकायदेशीर घातक केमिकल टाकल्याप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली.

यावेळी शेतकऱ्यांच्या विहिरीतील पाण्यातही केमिकल मिसळत असल्याने पाण्याचे नमुनेही तपासणीसाठी घेतल्याचे उपप्रादेशिक अमर दुर्गुळे यांनी सांगितले. (Sinnar Road fire site inspected by pollution control officials nashik news)

सिन्नर- शिर्डी रस्त्यावर असलेल्या वावी- पांगरी परीसरातील नाल्यात गेल्या काही महिन्यांपासून रात्रीच्या सुमारास कंपनीतील वापरलेला घातक ज्वलनशील केमिकलचे टँकरभरून नाल्यात सोडले जात असल्याचे परीसरातील नागरिकांची तक्रार आहे.

रविवारी अचानक या घातक केमिकल सोडलेल्या ठिकाणी आग लागली. सुरवातीला थोडक्यात असलेली आग क्षणार्धात रौद्ररूप धारण केले. यामुळे शेजारील शिंदे वस्तीतील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

यामुळे काही काळ रस्त्यावरील वाहतूक बंद झाली होती. रस्त्यावरच आगीचे लोळ दिसत असल्याने ज्वलनशील पदार्थाचा टॅंकर पेटले की काय, अशी शंका येत होती. या घटनेत नगर जिल्ह्यातील एका राजकीय नेत्यांचे कंपनीतील टॅंकर मुंबईवरून येतांना या ठिकाणी केमिकल सोडले जात असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Sinnar Chemical Fire Case
Dhanoli Small Irrigation Project: धनोली लघुपाटबंधारे प्रकल्पास दुसरी प्रशासकीय मान्यता : नितीन पवार

सदर घटनेची गंभीर दखल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतली असून सदर घटनास्थळी प्रादेशिक अधिकारी राजेंद्र राजपूत यांच्या आदेशाने उपप्रादेशिक अमर दुर्गुळे, फिल्ड ऑफिसर संजीव रहेदासनी, राजेंद्र सूर्यवंशी आदी अधिकारी- कर्मचाऱ्यांनी पाहणी केली.

यावेळी परीसरातील शेतकऱ्यांनी या घातक व ज्वलनशील केमिकलमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे. तसेच शेतातील विहिरीचे पाणी ही दूषित झाल्याच्या तक्रारी केल्या.

त्या अनुषंगाने परिसरातील विहिरीतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आलेत. सदरचे केमिकल कोणत्या स्वरूपाचे आहे, या बाबत तपासणी करून अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे श्री. दुर्गुळे यांनी सांगितले.

Sinnar Chemical Fire Case
Nashik News: ‘ओझर मिग एअरफोर्स’ ने घेतले जानोरी गाव दत्तक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com