Malegaon Bazar Samiti : मालेगाव बाजार समितीच्या सभापतीपदी अपेक्षेप्रमाणे अद्वय हिरे!

उपसभापतीपदी विनाेद चव्हाण यांची बिनविरोध निवड
Advay Hire and Team
Advay Hire and Teamesakal

Malegaon Bazar Samiti : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अपेक्षेप्रमाणे शिवसेनेचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे) उपनेते तथा पॅनलप्रमुख अद्वय हिरे यांची तर उपसभापतीपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सचिव विनोद चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली.

उपसभापतीपदी श्री. चव्हाण यांना संधी देवून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी श्री. हिरे यांचा महाविकास आघाडी मजबूत करण्याचा संकल्प दिसून आला. विजयानंतर हिरे समर्थकांनी ढोल-ताशांच्या गजरात गुलाल उधळत मोठा जल्लोष केला. (Advay Hire Chairman of Malegaon Bazar Samiti nashik news)

सभापती, उपसभापती निवडीसाठी गुरुवारी (ता.२५) सकाळी अकराला निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रशासक जितेंद्र शेळके यांच्या अध्यक्षतेखाली बाजार समिती सभागृहात विशेष सभा झाली.

सभेला अठरापैकी १५ संचालक उपस्थित होते. भुसे समर्थक आपलं पॅनलचे संजय घोडके, भिका कोतकर व चंद्रकांत शेवाळे हे तिघे संचालक अनुपस्थित होते. श्री. शेळके यांनी सभेचा मसुदा वाचन केला. यानंतर सर्व नवनिर्वाचित संचालकांचा ओळख परिचय करण्यात आला.

निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर सभापती पदासाठी अद्वय हिरे यांचा डॉ. उज्जैन इंगळे सूचक असलेला व रविंद्र सुर्यवंशी यांची अनुमोदक असलेला तर उपसभापती पदासाठी विनोद चव्हाण यांचा संदीप पवार सूचक, व रविंद्र मोरे अनुमोदक असलेला असे दोन्ही पदासाठी प्रत्येकी एकमेव अर्ज दाखल झाले.

छाननीत अर्ज वैध ठरल्यानंतर श्री. हिरे व श्री. चव्हाण यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा श्री. शेळके यांनी केली. दोघा उमेदवारांच्या नावाची घोषणा होण्यापुर्वीच समितीच्या मुख्य कार्यालयाबाहेर ढोल ताशांचा जल्लोष सुरु झाला होता.

सभापती पदासाठी श्री. हिरे यांचे नाव निश्‍चित होते. उपसभापती पदासाठी कोणाची वर्णी लागणार याविषयी मोठी उत्सुकता होती. ‘सकाळ’ने श्री. चव्हाण यांना संधी देण्याची शक्यता असे वर्तविलेले भाकित खरे ठरले. सभापती, उपसभापती व संचालकांचा श्री. शेळके यांनी श्री साईबाबांची मुर्ती व शाल देऊन सत्कार केला.

त्याचवेळी श्री. शेळके यांनी प्रशासकीय पदाच्या कारकिर्दीत पणन व शासनाचे एक कोटीचे देणे दिले. सध्या कुठलीही देणे बाकी नाही असे सांगतानाच प्रशासकीय कारकिर्दीतील कामाचा आढावा सादर केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Advay Hire and Team
Chandwad APMC : सभापती-उपसभापतींची बिनविरोध निवड; देवळ्यात ‘शेतकरी विकास’ची सत्ता

अद्वय हिरेंना अश्रू अनावर

समिती सभापती पदाची जबाबदारी सांभाळताना आनंद होत आहे. गेल्या निवडणुकीत यापुर्वी ११ मार्च २०१६ ला सभापती पदाची संधी हुकली होती. समसमान मते पडल्याने चिठ्ठीच्या कौलमध्ये काका प्रसाद हिरे विजयी झाले.

कुटुंबियांकडूनच पराभव झाला याचे समाधान होते. प्रशांत हिरे यांच्या नेतृत्वाखालील संचालकांनी बाजार समिती मेहनतीने उभारली. नावारुपाला आणली. समितीत खुप काम करण्याची गरज आहे. गेल्या दशकात येथे स्वार्थापलिकडे काही झाले नाही.

सर्व समाज घटकांना समान न्याय देऊ. आज प्रत्येक शेतकरी सभापती झाला आहे. कोणत्याही शेतकऱ्याला येथून मान खाली घालून जावे लागणार नाही. प्रत्येक शेतकरी दिनदुबळ्यांचा सन्मान होईल.

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका निवडणुकीत पालकमंञ्यांना त्यांची जागा दाखवू. बाजार समितीची निवडणूक ही निवडणूक नव्हती. एक जनआंदोलन झाले होते. आगामी सर्व निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून जिंकू. विरोधी संचालक आज येथे आले नाहीत. त्यांचाही सन्मान करू.

त्यांची मते विचारात घेऊ. त्यांनी कामकाजात सहभागी व्हावे असे आवाहन करतानाच सभापती झाल्याचा आनंद आमदार झाल्यापेक्षा मोठा आहे असे सांगतानाच सभापती अद्वय हिरे यांना अश्रू अनावर झाले.

आदर्श समिती निर्माण करु

"सभापतीपदी निवड झाल्याबद्दल अद्वय हिरे यांचे अभिनंदन करतो. कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांनी सहकाराच रोपट लावलं. त्यांचा पणतू सभापती झाला याचा मला आनंद आहे. त्याचवेळी मला उपसभापती पदाची संधी दिली. त्यांचा विश्वास सार्थ ठरवू. समितीची निवडणूक मतांचा फरक पाहता एकतर्फी झाली. मतदारांनी श्री. हिरे यांच्यावर विश्वास दर्शविला. त्यांची सभापती होण्याची इच्छा नसतानाही आम्ही सर्वांनी त्यांना गळ घातली. आमचा मान त्यांनी राखला. सभापती पद स्विकारले. राज्यात हिंगणघाट बाजार समिती आदर्श आहे. येथील बाजार समिती या समितीप्रमाणे आदर्श व आयडाॅल करण्याचा प्रयत्न करू."

- विनोद चव्हाण, उपसभापती, बाजार समिती मालेगाव

Advay Hire and Team
Dindori APMC : दिंडोरीत सभापतीपदी कड, कैलास मावळ उपसभापती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com