Onion Rates Hike: कांदा संपल्यावर बाजारभावाची झळाळी! शेतकऱ्यांत ‘कही खुशी- कही गम’

Onion left in the garden of a farmer in Devla.
Onion left in the garden of a farmer in Devla.esakal

देवळा : कांद्याचे भाव आता चांगलेच वधारले असले तरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे फारसा कांदा राहिला नसल्याने शेतकऱ्यांना ‘हसावे की रडावे’, असे झाले आहे.

भाववाढीच्या आशेत शेतकऱ्यांचा बहुतांश कांदा यापूर्वीच विकला गेला तर ठेवलेला काही कांदा सडल्याने शेतकऱ्यांकडे फारच कमी कांदा शिल्लक राहिला आहे.

भाव वाढल्याचा आनंद एका बाजूला तर दुसरीकडे कांदा शिल्लक राहिला नसल्याचे दुःख आहे. कांद्याचा भाव वाढला पण कांदा विकला गेला तर काही सडला’, अशी परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांत ‘कही खुशी- कही गम’ ची स्थिती आहे.

सध्या कांदा सरासरी ४००० ते ४५०० रुपये प्रतिक्विंटल विकला जात आहे. (After end of onion market price surge Some happiness some sadness among farmers nashik)

मागील वर्षी कांद्याला फारसा चांगला भाव मिळाला नसल्याने त्याची कसर या वर्षी काढू, या हेतूने कसमादे भागातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याचे उत्पादन काढले. उत्पादित केलेला कांदा चाळीमध्ये साठवला.

परंतु भाववाढीच्या प्रतीक्षेत पहिले सहा महिने भाव स्थिर राहिले. जेंव्हा भाववाढीचे संकेत मिळू लागले, त्याचवेळी कांद्याच्या किमती नियंत्रणात राहाव्यात म्हणून शासनाने कांदा निर्यातीवर ४० टक्के निर्यातशुल्क करत कांदा निर्यातीवर बंधने आणली.

याचा परिणाम म्हणून नंतर कधी शेतकऱ्यांनी तर कधी व्यापाऱ्यांनी निर्यातशुल्क विरोधात लिलाव बंद ठेवत बंडाचे शस्त्र काढले. यामुळे शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला कांदा चाळीतच खराब झाला.

सुरवातीला भाव नव्हता आणि भाव वाढू लागला, तर निर्यातशुल्क वाढवले मग व्यापाऱ्यांनी लिलाव बंद ठेवले. या दरम्यान मधल्या टप्प्यात कांदा खराब झाला आणि आता शेतकऱ्यांकडचा कांदा संपल्यात जमा असताना कांद्याला झळाळी आली.

Onion left in the garden of a farmer in Devla.
Nashik Onion Rate : नामपूर बाजार समितीत कांद्याला सर्वोच्च 5245 हजाराचा भाव

कधी अस्मानी कधी सुलतानी संकटात शेतकरी भरडला जात असताना आता नशिबाने भाव मिळू लागले तर कांदा संपल्याने पुन्हा शेतकऱ्यांवर डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे.

भाव वाढला असला तरी आता कांदे शिल्लक राहिले नाहीत, याची खंत एका बाजूला तर ज्यांचा शिल्लक आहे त्यांचेही बरेच नुकसान दिसत आहे. ही स्थिती पाहता कांद्याचे बाजारभाव दोन महिन्यापूर्वी वाढले असते तर सगळ्याच शेतकऱ्यांना या भाववाढीचा लाभ झाला असता.

यंदा दुष्काळी परिस्थिती असल्याने रब्बी हंगाम घेता येणार नाही. विहिरींना पाणी नसल्याने उन्हाळी कांदाही पिकवता येणार नसल्याचे चित्र आहे.

कांद्याच्या भावासोबत या वर्षी मक्याचे उत्पादन घटले आहे. जनावरांच्या वैरणीसाठी शेतकऱ्यांची चारा गोळा करण्याची धावपळ दिसून येत आहे.

"गेल्या दोन महिन्यांपूर्वी कांद्याचे भाव वाढण्याचे संकेत मिळू लागले असतानाच शासनाने निर्यातशुल्क वाढवत शेतकऱ्यांच्या आशा-अपेक्षावर पाणी फिरवले. आता कांद्याचे भाव वाढले असले तरी कांदा संपल्यात जमा असल्याने या भाववाढीचा शेतकऱ्यांना जो लाभ व्हायला पाहिजे होता, तो आता फारच कमी शेतकऱ्यांना होईल."- उद्धव भामरे, खुंटेवाडी

Onion left in the garden of a farmer in Devla.
Nashik News: पशुधन जगविण्यासाठी श्रमाच्या मोबदल्यात चारा! भाव वधारले; दुष्काळी भागाची होरपळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com