Nashik News : उद्योगमंत्र्यांच्या पत्रानंतर उद्योजकांचा बंद मागे; एकजूटतेबाबतचा संभ्रम दूर

After letter of Minister of Industry closed decision is called off nashik news
After letter of Minister of Industry closed decision is called off nashik news esakal

Nashik News : निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या कार्यालयावर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्हाभरातील उद्योजकांनी शुक्रवारी (ता.२) पुकारलेला बंद उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आला आहे. (After letter of Minister of Industry closed decision is called off nashik news)

बंदला सुरवातीपासून विरोधाचा सूर आवळणाऱ्यांनी सुद्धा बंदला आमचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट करीत, उद्योजकांमधील एकजूटतेबाबतचा संभ्रम दूर केला. निमा कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांच्यासह उद्योजकांच्या सुकाणू समितीतील पदाधिकारी डी. जी. जोशी, आयमा अध्यक्ष निखिल पांचाळ, ज्ञानेश्वर गोपाळे, विवेक पाटील, वरुण तलवार, निमाचे सरचिटणीस राजेंद्र जोशी, सीमा संघटनेचे अध्यक्ष किशोर राठी उपस्थित होते.

यावेळी त्यांनी बंदबाबत उद्योजकांची जी मागणी असून, त्यावर आजही ठाम असल्याचे स्पष्ट केले. उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री दादा भुसे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपर्यंत याविषयी चर्चा झाली असून, या प्रकरणातील दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

तसेच पोलिस आयुक्तांनी देखील या प्रकरणातील १९ दोषींची चौकशी केली जात असल्याचे सांगितले आहे. या घटनेबाबत आश्वासन मिळाल्यानंतर बंद मागे घेतला जावा, अशी मागणी श्री. बेळे यांनी सुकाणू समितीला केली असता, समितीचे ज्ञानेश्वर गोपाळे यांनी बंद मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

After letter of Minister of Industry closed decision is called off nashik news
NMC News : रस्ते काँक्रिटीकरणासाठी सव्वा सहाशे कोटीची मागणी

दरम्यान, बंदला सुरवातीपासूनच विरोधाचा सूर आवळणाऱ्यांनी घुमजाव केल्याचे दिसून आले. संघटनेचे अध्यक्ष किशोर राठी यांनी मी बंदला विरोध केला नसल्याचे सांगताना आमचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले आहे. राठी यांच्या दुटप्पी भूमिकेबद्दल मात्र संघटनेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

"उद्योजकांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी ऋणी आहे. उद्योग वाढावा ही आमची भूमिका असून, ती कायम असणार आहे. उद्योगमंत्र्यांसह पालकमंत्री व अन्य नेत्यांनी दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन देताना बंद मागे घेण्यास सांगितले आहे."- धनंजय बेळे, अध्यक्ष, निमा

उद्योगमंत्र्यांसोबत बैठक

या प्रकरणी ७ किंवा ८ जूनला मंत्रालयात उद्योगमंत्र्यांसोबत बैठक बोलविण्यात आली आहे. त्यास बेळे यांच्यासह सुकाणू समितीतील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. बैठकीत हल्ला प्रकरणी चर्चा केली जाणार असून, दोषींवर कारवाई व्हावी ही उद्योजकांची मागणी कायम असणार आहे.

After letter of Minister of Industry closed decision is called off nashik news
SSC Result 2023 : राज्यात दहावीचा निकाल आज दुपारी 1ला; या संकेतस्थळावर विषयनिहाय गुणांची माहिती मिळणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com