#Lockdown : "अनेक दिवसानंतर सुसंवाद घडतोय..घराला घरपण येतयं"

family games111.jpg
family games111.jpg

नाशिक / दहीवड : सध्याच्या धावपळीच्या युगात बऱ्याच दिवसांनंतर वडीलांनी कुटुंबाला दिलेला वेळ..सकाळचा नास्ता झाल्यानंतरच टीव्हीसमोर बसण्याऐवजी घरगुती खेळाला झालेली सुरुवात.... गच्चीवर जाऊन मिनी क्रिकेटचा घेतलेला आनंद... खरंतर हे बंद पडलेले खेळ आणि हरवलेली नाती पुन्हा एकरूप होताना दिसून आली याला निमित्त ठरले कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने केलेल्या आवाहनाचे व सर्वत्र सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीचे... 

अडगळीत पडलेले घरगुती खेळ पुन्हा सुरू
सुटीच्या दिवसातही कुटुंबात रममान न होणारे आई-वडील आज खऱ्या अर्थाने मुलांसोबत मुल बनून खेळले. कित्येक वर्षांपासून घराच्या अडगळीत असलेला कॅरम बोर्ड, चल्लसचा खेळ, बुद्धीबळ, सापशिडीचा खेळ रंगला. मुलांनी आईला तर मुलींनी वडिलांना आपल्या संघात घेऊन या घरगुती खेळाचा मनमुराद आनंद लुटला. वडीलांनी तयार केलेले पदार्थही मुलांना चाखायला मिळाले. पहाटेचा नास्ता झाल्यानंतरच टीव्हीसमोर बसण्याऐवजी घरगुती खेळाला सुरुवात झाली. काहींनी टेरेस्टवर जाऊन मिनी क्रिकेटचा आनंद घेतला.

कुटुंबातील संवाद कमी झाला होता...पण आता..
प्रशासनाने पुढील काही दिवस घराबाहेर पडू नये असे आवाहन केले आहे. सर्वत्र कलम 144 लागू केल्याने संचारबंदी सदृश्य स्थिती आहे. कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येक जण स्वयंस्फूर्तीने घरात थांबून आहे. मिळालेल्या सुटीचा कुटुंबासोबत आनंद लुटणे नागरिक व्यस्त आहेत. काही ठिकाणी आजी-आजोबा, काका यांच्यासोबतही वेळ घालविण्यात आला. गप्पांमधून ज्येष्ठांनी आपले बालपण मुलांना सांगितले. लॉकडाऊनमुळे सर्वांना घरात रममान होण्याची संधी मिळाली आहे. कोणत्याही कारणाने का असो ना कुटुंबातील संवाद कमी झाला होता. पण कोरोनामूळे प्रशासनाने घरात राहण्याबाबत केलेल्या आवाहनामुळे हरवलेला संवाद पुन्हा सुरू अशी प्रतिक्रिया विविध कुटुंबातून व्यक्त होत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमूळे कुटुंबियांमध्ये सुसंवाद घडतोय व घराला घरपण आल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.

अनेक छोट्या परिणामकारक खेळांना यानिमित्ताने उजाळा 

कोरोना जागतिक महामारीने सर्व देश लॉकडाऊन झालेला असतांना जुने ते हवे आणि लहानग्यांना जुने खेळ जतन करण्यासाठी योग्य संस्कार यानिमित्ताने देता येत आहे.घरीच राहून अडगळीत पडलेल्या अनेक छोट्या परिणामकारक खेळांना यानिमित्ताने उजाळा देता येत आहे.- भरत पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com