esakal | 'तो' मदत करायला गेला... अन् त्यालाच
sakal

बोलून बातमी शोधा

beating to electricity worker.jpg

संबंधित अधिकाऱ्यांनीही लग्नाचे काम असल्याने लगेचच कर्मचाऱ्यांना घटनास्थळी जाण्याचे सांगून त्वरित वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले. कर्मचारी शिवा साळवे यांनी सहकाऱ्यांसोबत संतोषीमाता झोपडपट्टीमधील लग्नघरी दाखल झाले.

'तो' मदत करायला गेला... अन् त्यालाच

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक : (सातपूर) हळदीच्या दिवशी अचानक वीज गेल्याने लग्नघरातील वीज सुरळीत करण्यासाठी गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्यालाच दारूच्या नशेत असलेल्या पाहुण्यांनी मारहाण केली. याप्रकरणी सातपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. 

असा आहे प्रकार

सातपूर येथील संतोषी मातानगर येथे लग्नाच्या आदल्या दिवशी हळदीच्या कार्यक्रमात रात्री अचानक वीज गेली. लग्नघरातील मंडळींनी लगेचच महावितरणच्या आधिकाऱ्यांकडे वीजपुरवठा सुरळीत करण्याची विनंती केली. संबंधित अधिकाऱ्यांनीही लग्नाचे काम असल्याने लगेचच कर्मचाऱ्यांना घटनास्थळी जाण्याचे सांगून त्वरित वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले. कर्मचारी शिवा साळवे यांनी सहकाऱ्यांसोबत संतोषीमाता झोपडपट्टीमधील लग्नघरी दाखल झाले. मात्र, दारूच्या नशेत असलेल्या वऱ्हाडी मंडळींनी मुद्दाम वीज बंद करण्याचा आरोप करत साळवे व त्यांच्या सहकाऱ्यांना मारहाण करत गंभीर जखमी केले. याप्रकरणी कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवताच त्यांनी गंभीर दखल घेत संबंधितावर पोलिसांत तक्रार देण्यास सांगितले.  

हेही वाचा > प्रदर्शन बघायला 'तो' आला तर खरा...पण, जीवानिशी गेला!...

हेही वाचा > अक्षरशः चक्काचूर! अखेर 'असा' झाला मैत्रीचा दुर्देैवी अंत..

loading image