ऑनलाइन सभेत धूमशान! सत्ताधारी, विरोधकांमध्ये पत्रकार परिषदेतच आरोप-प्रत्यारोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sinner.jpg

आजची विशेष सभा ही विरोधकांच्या मागणीनुसारच बोलावल्याचेही त्यांनी सांगितले. या वेळी स्वगृही परतलेल्या नगरसेविका विजया बर्डे यांनी आपण काम करणाऱ्यांसोबत रहाणार असल्याचे सांगत शहराचा विकास हेच ध्येय असल्याचे स्पष्ट केले. 

ऑनलाइन सभेत धूमशान! सत्ताधारी, विरोधकांमध्ये पत्रकार परिषदेतच आरोप-प्रत्यारोप

सिन्नर (नाशिकरोड) : कोरोनामुळे ऑनलाइन होणाऱ्या नगरसेवकांच्या सभेत बुधवारी (ता. ११) विरोधकांनी सत्ताधारी गटावर निशाणा साधत विश्वासात घेतले जात नसल्याचा, तसेच विरोधकांच्या प्रभागात कामे होत नसल्याचा आरोप केल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धूमशान रंगले.

यावर चर्चा व्हायला हवी

ऑनलाइन बैठकीत तांत्रिक अडचणी येत असल्याने ती रद्द करून पालिकेच्या नवीन सभागृहात नव्याने पुन्हा सभा बोलविण्याची मागणी विरोधी गटाचे उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले व विरोधी पक्षनेते नामदेव लोंढे यांनी पत्रकार परिषदेत केली. तर सत्ताधारी गटातर्फे नगराध्यक्ष किरण डगळे, गटनेते हेमंत वाजे यांनीही पत्रकार परिषद घेत शासनाच्या जीआरनुसारच ऑनलाइन सभा घेतल्याचे सांगितले. विरोधकांनी पालिकेचे मुख्याधिकारी विश्वासात घेत नसल्याचा आरोप करत आजच्या विशेष सभेतील विषयांमध्ये जनतेची निव्वळ दिशाभूल व निधीची लूटमार सुरू असल्याचा आरोप करत ३१० विषय ऑनलाइन सभेत झटपट मंजूर केले. मात्र यावर चर्चा व्हायला हवी होती. 

ठेकेदारांची पालिका झाल्याचा आरोप

झालेल्या कामांचे पैसे मंजूर करण्यासाठीच ऑनलाइन सभा घेतली जाते. नवीन पाणी योजनेबाबत गांभीर्य राहिले नाही. गेल्या चार वर्षांपासून फक्त ठेकेदारांची पालिका झाल्याचा आरोप केला. या वेळी नगरसेवक रामभाऊ लोणारे, सुहास गोजरे, नगरसेविका गीता वरंदळ, शीतल कानडी, वासंती देशमुख, सुजाता तेलंग, चित्रा लोंढे, अलका बोडके, मालती भोळे, निरुपमा शिंदे, प्रीती वायचळे, माजी नगरसेवक मेहमूद दारूवाला आदी उपस्थित होते. 

शहराचा विकास हेच ध्येय असल्याचे स्पष्ट

दरम्यान, नगराध्यक्ष श्री. डगळे यांनी सभेतील ३१० विषयांपैकी १९८ विषय हे विरोधकांनीच दिलेले होते. सर्वांना बरोबरीने घेऊन काम करण्याची आपली भूमिका असल्याचे सांगत सर्वांनी एकत्रपणे शहरासाठी काम करावे. त्यांच्याकडे गेलेल्या नगरसेविका आता आमच्यात सहभागी झाल्याने त्यांनी आज कांगावा केल्याचे स्पष्ट केले. आजची विशेष सभा ही विरोधकांच्या मागणीनुसारच बोलावल्याचेही त्यांनी सांगितले. या वेळी स्वगृही परतलेल्या नगरसेविका विजया बर्डे यांनी आपण काम करणाऱ्यांसोबत रहाणार असल्याचे सांगत शहराचा विकास हेच ध्येय असल्याचे स्पष्ट केले. 

हेही वाचा >  भाजप नेत्याच्या वाढदिवसाचा भररस्त्यात जल्लोष! पोलिस प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

आपण प्रशासनाच्या भूमिकेतूनच काम करतो. सर्व नगरसेवकांना समान न्याय देण्याची आपली भूमिका आहे. आजच्या ऑनलाइन सभेत सर्वांनी एकाच वेळी आपले माईक सुरू केल्याने गोंधळ झाला. - संजय केदार, मुख्याधिकारी, सिन्नर नगर परिषद 

हेही वाचा > मामा होता म्हणून भाची सहीसलामत! अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले भाचीला

loading image
go to top