भारती पवारांचे 'ते'आरोप बिनबुडाचे! नाशिकमध्ये मंत्र्यांचे आरोप-प्रत्यारोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bharati pawar

भारती पवारांचे आरोप बिनबुडाचे! नाशिकमध्ये आरोप-प्रत्यारोप

नाशिक : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Bharati Pawar) विरोधी पक्षात असल्याने आरोप करणे स्वाभाविकच आहे. मात्र, राज्य शासनाचे सुरू असलेले चांगले काम दिसत नसल्याने त्यांनी माझ्या कामाविरुद्ध आरोप केले. मात्र, हे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याची प्रतिक्रिया आदिवासीमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी दिली.

मंत्र्यांच्या आरोप-प्रत्यारोपांची चांगलीच चर्चा रंगली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा रुग्णालयातील कार्यक्रमास आल्या असता, त्यांनी माध्यामांसमोर अ‍ॅड. पाडवी यांच्या कामाविरोधात माझ्याकडे खूप तक्रारी आल्या आहेत. आदिवासी विभागातील योजनांचा बोजवार उडाला आहे. आश्रमशाळांचे प्रश्न ऐरणीवर असताना, त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. खावटी वाटपातही मोठा भ्रष्टाचार झाल्याचा खुद्द त्यांच्या सरकारमधील राष्ट्रवादी व काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींनीकडून सांगण्यात येत असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले. दरम्यान, अंबडमधील आयमा हॉलमध्ये महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर पवार यांच्या आरोपाला मंत्री पाडवी यांनी उत्तर दिले. दोन्ही मंत्र्यांच्या आरोप-प्रत्यारोपांची चांगलीच चर्चा रंगली.

हेही वाचा: शाळाच नाही अन् नोकरभरतीचा प्रयत्न! इगतपुरीतील प्रकार

आरोप करणाऱ्या ‘त्या’ आमदारांचा माफीनामा

सुरवातीला खावटी अनुदान योजनेला काही लोकप्रतिनिधींचा आक्षेप होता. मात्र, आता सर्व सुरळीत झाले आहे. माझ्याविरुद्ध भ्रष्टाचार व मंत्री म्हणून सक्षम नसल्याची तक्रार पक्षातील आमदाराने वरिष्ठांना केली होती. नंतर त्याच आमदारांनी मला भेटून, ‘मी दुसऱ्यांच्या सांगण्यावरून आरोप केले होते. तक्रार केलेले पत्र नजरचुकीने लिहिल्याचे मान्य केले व लेखी स्वरूपात माफीनामा दिल्याचे ॲड. पाडवी यांनी सांगितले.

के. सी. पाडवी : नाशिकमध्ये मंत्र्यांचे आरोप-प्रत्यारोप

मंत्री पाडवी म्हणाले, की कोरोना संकटात आदिवासी विकास विभागाने सर्वांत जास्त काम केले आहे. ते आदिवासी समाजाला माहिती असून, ते विभागाच्या कामकाजावर समाधानी आहेत. कोरोनात स्थलांतरित आदिवासी बांधवांना घरी आणले. फडणवीस सरकारच्या काळात बंद झालेल्या खावटी अनुदान योजनेचे पुनरुज्जीवन करून १२ लाख आदिवासी बांधवांना लाभ देण्याचा निर्णय घेत ९० टक्के पात्र आदिवासींना खावटी अनुदान दिले.

हेही वाचा: लहान्याची दारू सोडवण्यासाठी गेलेल्या भावंडाना वाहनाने चिरडले

Web Title: Allegations Of Ministers Political Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..