esakal | नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटना : महिलेसाठी रुग्णवाहिका ठरली जीवनदायिनी!

बोलून बातमी शोधा

Nashik oxygen leakage
नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटना : ती रुग्णवाहिका महिलेसाठी ठरली जीवनदायिनी..!
sakal_logo
By
युनूस शेख

जुने नाशिक : डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन प्लॅंटच्या टॅंकला गळती लागून मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन वाया गेल्याची घटना घडली. त्यात आतापर्यंत तब्बल २२ जणांचा मृत्यू झाला असून बहुतांशी रुग्णांची परिस्थिती गंभीर झाली. या दुर्दैवी घटनेत अनेक रुग्णांनी वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्याने प्राण सोडला. दरम्यान या कठीण प्रसंगात एका महिलेसाठी मात्र रुग्णवाहिका धावून आली.

ऑक्सिजन टाकीला गळती सुरु झाला आणि ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने ऑक्सिजन बेडवर उपचार सुरु असलेल्या महिला रुग्णांची तब्येत गंभीर झाली. हमीदा सय्यद या महिलेसही वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्याने तिची प्रकृती अत्यावस्थ झाली. सुदैवाने नातेवाईकास घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. तिचे नातेवाईक रफीक शेख यांनी तत्काळ ओळखीतील दोन रुग्णवाहिकाना घटनास्थळी बोलावून घेतले. दोन्ही रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन टाकीतून महिलेस ऑक्सिजन पुरवठा केल्याने अवघ्या काही वेळात त्या महिलेची परिस्थिती स्थिर झाली. रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन पुरविल्याने तिची प्रकृती स्थिर झाली. तिच्यासाठी ती रुग्णवाहिका जीवनदाहिनी ठरल्याची प्रतिक्रिया नातेवाइकांनी दिल्या.

हेही वाचा: धडपड, आक्रोश अन्‌ हुंदक्‍यांनी नाशिक सुन्न! रुग्णालयात अंगावर काटा आणणारे दृश्‍य

तीन-चार रुग्णांनी तडफडत मृत्यू

सुदैवाने त्या महिलेच ऑक्सिजन मिळाल्याने तीचा जीव वाचला असला तरी तिच्या समोर बेडवरील अन्य तीन-चार रुग्णांनी तडफडत प्राण सोडल्याने याचा महिलेवर गंभीर परिणाम झाला. वैऱ्यावरदेखील अशी परिस्थिती होवू नये, अशा प्रतिक्रिया नातेवाइकांनी व्यक्त केल्या. शिवाय प्लांट तयार करणारे ठेकेदार आणि आरोग्य व्यवस्था यास जबाबदार असल्याचेही त्यांनी सांगितले.


वेळेवर ओळखीतील रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन टाकी मिळाल्याने हमीदा सय्यद यांना वेळेवर ऑक्सिजन पुरवठा करता आला. त्यामुळे त्यांच्यासाठी ती जीवनदाहिनी ठरली आहे. वेळेवर रुग्णवाहिकाधारकांनी ऑक्सिजन टाकीची मदत केल्याने त्यांचादेखील आभारी आहे.
-रफिक शेख, रुग्ण महिलेचा नातेवाईक

हेही वाचा: नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटना : आतापर्यंत २२ रुग्णांचा मृत्यू; जिल्हाधिकारींची माहिती