नाशिक : कोरोनामुळे येणाऱ्या शारीरिक थकव्यावर मात शक्य | Immunity

immunity
immunityesakal

नाशिक : सिन्नरच्या औद्योगिक क्षेत्रातील ॲडव्हान्स्ड एन्झाइम टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या इम्युनोसेब आणि बायोम अल्ट्रा या उत्पादनांना अमेरिकन सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेची मान्यता मिळाली आहे. नाशिकस्थित बहुराष्ट्रीय कंपनीने केलेल्या कोरोना (Corona) पश्चात शारीरिक थकव्यावर गुणकारी औषध निर्मिती करून आपल्या यशाचा आलेख चढता ठेवला आहे.

कोरोनानंतर उद्भवणाऱ्या आजारांचा त्रास अधिक होऊ शकतो

कोरोना होऊन गेल्यानंतर रुग्णांना सहा महिने ते एक वर्षांपर्यंत विविध प्रकारचे शारीरिक त्रास जाणवत असतात. थकवा, भूक न लागणे, अशक्तपणा, अंगदुखी, श्वास घेण्यास अडचण, छाती दुखणे, सांधेदुखी, निद्रानाश, विस्मरण, एकाग्रता भंग पावणे अशा प्रकारच्या 116 वेगवेगळ्या स्वरूपाची लक्षणे या रुग्णांमध्ये आढळतात. कोरोनाने जेवढे नुकसान झाले नाही त्यापेक्षा अधिक त्रास रुग्णांना या लक्षणांमुळे होऊ शकतो. कोरोना आजाराची तीव्रता गंभीर अथवा सौम्य असली तरी वरील लक्षणे रुग्णांमध्ये कमी अधिक प्रमाणात उद्भवू शकतात. या त्रासांपासून मुक्तता मिळवण्यासाठी प्रोबायोटिक्स (Probiotics) आणि एन्झाइम्स (Enzymes) प्रभावी ठरू शकतात. जगभरात कधी लोकांना या त्रासाला सामोरे जावे लागले आहे. एन्झाइम व प्रोबायोटिक्सद्वारे या त्रासापासून 14 दिवसांमध्ये रुग्णाची मुक्तता होऊ शकते असे स्वीडनच्या मेडिसिन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या शोध प्रबंधात नमूद करण्यात आले आहे.

immunity
प्रेग्नेंसीमध्ये Vitamin D का महत्त्वाचे? कमतरतेमुळे वाढू शकतो धोका

या प्रबंधानुसार वैद्यकीय चाचणी केलेल्या 91 टक्के लोकांचा थकवा पूर्णपणे नाहीसा झाल्याचे आढळून आले आहे. विशेष म्हणजे ही उत्पादने सिन्नरच्या माळेगाव औद्योगिक वसाहतीत उत्पादीत करण्यात आली आहेत.

''लांबलेल्या कोविड संदर्भात आम्ही केलेल्या कामाची दखल अमेरिकन गव्हर्मेंट च्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने घेतली असून त्याला डॉक्टर फॅक्ट शीट फाॅर कोविडमध्ये स्थान देण्यात आले आहे. ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. या संशोधित उत्पादनांचा गरजूंनी लाभ घ्यावा. सध्या ही उत्पादने अमेझॉन तसेच इतर ऑनलाईन शॉपिंग पोर्टलवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत.'' - डॉ. अभिजित राठी, संशोधक ॲडव्हान्स्ड एन्झाइम्स

immunity
पुरूषांनो, रात्री विड्याचे पान खाल्ल्याने होतात ४ फायदे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com