Nashik News: अंगणवाडी सेविकांची 30 एप्रिलला निवृत्ती; कर्मचाऱ्यांकडून स्वागत ; प्रलंबित मागण्यांबाबत काय?

anganwadi workers
anganwadi workersesakal

नामपूर : एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या सेवानिवृत्तीचा तारीख ३० एप्रिल अशी निश्‍चित करण्यात आली आहे.

याबाबतचा सरकारने निर्णय नुकताच जारी केला. त्यामुळे आगामी काळात राज्यातील अंगणवाडी सेविका एकाच दिवशी निवृत्त होतील. सरकारच्या निर्णयाचे राज्यातील अंगणवाडी सेविकांनी स्वागत केले आहे.

मात्र प्रलंबित मागण्यांसाठीच्या संपाचे काय? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. (Anganwadi workers retire on April 30 Welcome from staff What about pending claims Nashik News)

कार्यालयीन नोंदीनुसार १ जानेवारी ते १ मे (दोन्ही दिवस धरून) या कालावधीत जन्म तारीख असणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्याच वर्षातील ३० एप्रिलला सेवानिवृत्त करण्यात येईल.

तसेच जन्म तारीख २ मे ते ३१ डिसेंबर (दोन्ही दिवस धरून) यादरम्यान असणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पुढील वर्षाच्या ३० एप्रिलला सेवानिवृत्त करण्यात येईल, असे आदेशात नमूद केले आहे.

एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत असून या योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या नोंदणी कर्मचाऱ्यांचे सेवा समाप्तीचे वय ३० नोव्हेंबर २०१८ च्या सरकारच्या निर्णयाद्वारे निश्‍चित करण्यात आले आहे.

कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसंबंधी २ फेब्रुवारी २०२३ च्या सरकारच्या निर्णयाने अटी व शर्थी निश्‍चित करण्यात आल्या आहेत.

anganwadi workers
Nashik News: इगतपुरी तालुक्यात 28 पासून वारकऱ्यांचा दौरा; स्वानंद वारकरी शिक्षण संस्थेचा पुढाकार

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया सुलभ होण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीसाठी प्रत्येकवर्षी ३० एप्रिल हा दिवस निश्‍चित करण्याबाबत केंद्र सरकारने यापूर्वी सूचना दिल्या आहेत.

योजनेमधील राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीबाबत ३० नोव्हेंबर २०१८ व २ फेब्रुवारी २०२३ च्या सरकारच्या निर्णयाच्या अनुषंगाने कार्यवाही करताना १३ डिसेंबरच्या सरकारच्या निर्णयातील कार्यपद्धतीचा अवलंब करावा लागणार आहे.

"एकाच दिवशी अंगणवाडी सेविकांना निवृत्त करण्याचा निर्णय चांगला आहे. भविष्यात एकाचवेळी रिक्तपदांचा तपशील उपलब्ध होणार असल्याने भरती प्रक्रिया सुटसुटीत होईल. परंतु राज्यातील अंगणवाडी सेविका आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून बेमुदत संपावर आहे. त्याबाबत सरकारने गंभीरपणे विचार करणे गरजेचे आहे. अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे गरोदर माता, लहान बालके आदींचे सरकारच्या दुर्लक्षामुळे नुकसान होत आहे."- हिरुबाई जाधव, अंगणवाडी सेविका

anganwadi workers
SAKAL Exclusive: नांदगाव बायपाससाठी नव्याने सर्वेक्षणासाठी 24 लाखांचा प्रस्ताव! राष्ट्रीय महामार्ग ठरतोय डोकेदुखी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com