खडतर प्रशिक्षणानंतर सिन्नरचा अनिकेत चव्हाणके देशसेवेत!

aniket chavanke selected in army
aniket chavanke selected in armyesakal

सिन्नर (जि.नाशिक) : पुण्यातील खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) च्या १४० व्या दीक्षान्त सोहळ्यात सिन्नर येथील अनिकेत चव्हाणके याची खडतर प्रशिक्षणानंतर सैन्यदलात अधिकारीपदी नियुक्ती झाली. अनिकेतसह या तुकडीत नाशिक जिल्ह्यातील ओम गांगुर्डे, वेदांत घंगाळे व प्रणव जोपळे यांचाही समावेश आहे. (Aniket-Chavanke-selected-in-Army-sinner-nashik-marathi-news)

पहिल्याच प्रयत्नात अनिकेतचे यश

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या परीक्षेत तीन वर्षांपूर्वी अनिकेतने पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले होते. त्यानंतर त्याने ‘एनडीए’त प्रवेश घेतला. शनिवारी (ता. २९) पुणे येथे अनिकेतचा समावेश असणाऱ्या १४० व्या तुकडीचा दीक्षान्त सोहळा झाला. भारतीय नौसेनेचे चीफ ॲडमिरल करमजित सिंग यांनी या पासिंग आउट परेडला उपस्थित राहून सैन्यदलात प्रविष्ट होणाऱ्या युवा अधिकाऱ्यांना संबोधित केले. ‘एनडीए’मधील खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर अनिकेत आयएमए (डेहराडून) येथील ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमीत एक वर्षाच्या प्रशिक्षण सत्रात सहभागी होणार आहे.

aniket chavanke selected in army
नाशिकमध्ये आजपासून निर्बंध शिथिल; वीकेंड लॉकडाउन मात्र कायम

खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर यश

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी विभागीय अधिकारी मुकेश चव्हाणके यांचा अनिकेत मुलगा असून, चव्हाणके कुटुंबीय सिन्नर तालुक्यातील किर्तांगळी येथील रहिवासी आहे. अनिकेतच्या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. कोरोना संसर्गामुळे अनिकेतच्या दीक्षान्त सोहळ्यासाठी त्याचे आई-वडील उपस्थित राहू शकले नाही. मात्र, त्यांच्यासाठी ‘एनडीए’कडून ऑनलाइन उपस्थितीसाठी व्यवस्था करण्यात आली होती.

aniket chavanke selected in army
'ते' लग्न इगतपुरीच्या रिसॉर्टला पडले महागात!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com