Antarnad Program : गोदाकाठी ढोल ताशांचा गडगडाट; एका लयात, एका तालात महावादनाने वेधले लक्ष

Students performing in the ongoing 'Antarnad' at Gangaghat.
Students performing in the ongoing 'Antarnad' at Gangaghat. esakal

Nashik News : लयबद्ध, तालबद्ध ढोल-ताशांच्‍या वादनाने शनिवारी (ता.१८) नाशिककरांचे लक्ष वेधले. गोदाकाठी झालेल्‍या या वादनाच्‍या कार्यक्रमात ढोल ताशांचा गडगडाट पाहाण्यासाठी गर्दी झाली होती. (Antarnad Program thunder of Mahavadana on Godakath nashik news)

महापालिका आणि नववर्ष स्वागत यात्रा समिती यांच्यातर्फे महावादनाचा कार्यक्रम पार पडला. यंदा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण होत असून, या ३५० व्या हिंदू साम्राज्य स्थापना वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी ढोल-ताशा वादनाचा महोत्सव अर्पण करण्यात आला.

पाडवा पटांगण येथे पार पडलेल्‍या या कायक्रमात सुमारे एक हजार युवक-युवती सहभागी झाले होते. महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, आमदार ॲड. राहुल ढिकले, अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, पंचवटी विभागीय अधिकारी नरेंद्र शिंदे, गिरीश निकम, नववर्ष स्वागत यात्रा समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, समितीचे सचिव जयंत गायधनी व उपाध्यक्ष राजेश दरगोडे आदी उपस्थित होते.

महावादनात दोनशे ताशे आणि पंधराशे वादक आणि झांज वादकांचा समावेश होता. तसेच आयोजनात सुमारे शंभर स्‍वयंसेवकांनी सहभाग नोंदविला. यावर्षी शिवतांडव ढोल ताशा पथकाचे प्रमुख मिलिंद उगले महावादनाचे प्रमुख होते.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

Students performing in the ongoing 'Antarnad' at Gangaghat.
Sudhakar Badgujar News: गद्दारांना जनताच धडा शिकवेल : सुधाकर बडगुजर

सर्व तीस पथक प्रमुखांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुती कापसे यांनी केले. शिवाजी बोदार्डे, जयेश क्षेमकल्याणी, योगेश गर्गे, विनायक चंद्रात्रे, रोहित गायधनी, प्रसाद गर्भे, दीपक भगत यांनी कार्यक्रमासाठी परीश्रम घेतले.

सादरीकरणाने वेधले लक्ष

ध्वजप्रणाम करत ‘भारत माता की जय’ या घोषणेने महावादन कार्यक्रमाची सुरवात झाली. त्यानंतर पहिला हात मग पाचवा हात यांचे वादन केले. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि जिजाऊ साहेब यांची गारद देण्यात आल्‍यानंतर शिवस्तुतीचे सादरीकरण केले.

शरयू व्यास यांनी सामूहिक वंदे मातरम्‌ म्हटले. तब्बल दीड तास चाललेल्या महावादनाने गोदातीर दुमदुमून गेला होता.

Students performing in the ongoing 'Antarnad' at Gangaghat.
World Sparrow Day : 'त्यांनी' घराच्या गॅलरीलाच बनवले पक्षीघर! पक्ष्यांना निवारा देण्याचा प्रयत्न

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com