Anti Motorcycle Theft पथक ॲक्शन मोडमध्ये; 3 दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस | Latest Crime News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'Anti-Motorcycle Theft' Squad of Deputy Commissioner of Police Circle along with two-wheeler thieves and stolen two-wheelers

Anti Motorcycle Theft पथक ॲक्शन मोडमध्ये; 3 दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस

जुने नाशिक : दुचाकी चोरीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिस आयुक्तालयाकडून ‘ॲन्टी मोटरसायकल थेप्ट’ विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे.

हे पथक ऍक्शन मोडमध्ये आले आहे.पथकाकडून पाच दिवसात तीन दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहे. तर, दोन जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या. (Anti Motorcycle Theft Squad in action mode 3 Bike Theft Crimes Revealed Nashik Latest Crime News)

पोलिस उपायुक्त परिमंडळ १ मार्गदर्शनातील ‘ॲन्टी मोटरसायकल थेप्ट’ विशेष पथकातील शिपाई संतोष पवार यांना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजित सोनवणे, कर्मचारी संतोष पवार, अमित आव्हाड, इरफान शेख, श्रीकृष्ण पडोळ, गोरक्ष साबळे यांनी एनडी पटेल रोड एसटी महामंडळ विभागीय कार्यालय परिसरात सापळा रचून शहानवाज शहाबुद्दीन शेख (१९, रा. खडकाळी) यास अटक केली.

त्याच्याकडून चोरीची दुचाकी जप्त केली. पोलिस ठाण्यात दोन्ही दुचाकी चोरीबाबत गुन्हा दाखल आहे. पुढील कारवाईसाठी संशयितांसह दुचाकी त्यांच्या ताब्यात देण्यात आली. दुचाकी चोरीवर नियंत्रण आणण्यासाठी विशेष करून तयार करण्यात आलेले पथकाने ॲक्शन मोडमध्ये येत पाच दिवसात सलग दुसरी कारवाई केली आहे.

रविवारी (ता. ३०) अशाच प्रकारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक येथून दुचाकी चोर संशयित शरद सुखलाल बडगुजर (रा. पंचशीलनगर, गंजमाळ) यास सापळा रचून ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून दोन चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या होत्या.