करंजकरांचे आमदारकीचे स्वप्न भंगणार ? | Nashik News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shiv Sena district chief Vijay Karanjkar

करंजकरांचे आमदारकीचे स्वप्न भंगणार ?

नाशिक रोड : राज्यात चाललेल्या सत्तांतराच्या हालचालींमुळे सध्या सत्तेतून शिवसेनेला (Shiv Sena) पाय उतार व्हावे लागत असल्यामुळे राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची नियुक्ती रखडली आहे. त्यातील नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेच्या पहिल्या राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या यादीत असलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर (Shiv Sena district chief Vijay Karanjkar) यांचे आमदारकीचे स्वप्न भंगल्याची चर्चा सध्या नाशिक शहरात सुरू आहे.

नाशिक जिल्ह्याच्या इतिहासात शिवसेनेच्या (Shiv Sena) कोट्यातून पहिल्यांदाच राज्यपाल नियुक्त आमदारकीची माळ विजय करंजकर यांच्या गळ्यात पडणार होती. मात्र राज्याच्या राजकारणातील उलथापालथी मुळे १२ राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती रखडली होती. सध्या सरकार संकटाच्या खाईत असल्यामुळे विजय करंजकर यांची आमदारकी रखडणार आहे. पर्यायाने नाशिक जिल्ह्याच्या इतिहासातल्या या पहिल्या नियुक्तीला ग्रहण लागणार असल्यामुळे नाशिक जिल्ह्यात चर्चेचा विषय होत आहे.

नाशिक जिल्ह्यात भगूर हे गाव क्रांतीचे ठिकाण समजले जाते. शिवसेनेची सलग तीस वर्षे देवळाली मतदार संघावर सत्ता होती. विजय करंजकर यांनी २०१२ पासून जिल्हा प्रमुखाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सिन्नर, भगूर, इगतपुरी तालुक्यातील नगरपरिषदेवर भगवा फडकावला आहे.

त्याचप्रमाणे नाशिक, इगतपुरी, सिन्नर पंचायत समितीवर ही शिवसेनेची निर्विवाद सत्ता आणली आहे. जिल्हा परिषद व महानगरपालिकेत ही शिवसेनेचे संख्याबळ वाढवण्यासाठी जिल्हा प्रमुख या नात्याने कामगिरी बजावली आहे. भगूरचे नगराध्यक्षपदा बरोबरच २००० पासून ते आजपर्यंत त्यांनी नगरसेवक पद भूषविले आहे.

हेही वाचा: Eknath Shinde : सोशल मीडियावर राजकीय घडामोडींची ‘खिल्ली’

विजय करंजकर हे आक्रमक शिवसैनिक म्हणून सर्वत्र सुपरिचित आहे. हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या पहिल्या खासदारकीच्या विजयासाठी त्यांनी जोरदार बॅटिंग केली होती. पक्षासाठी केलेले काम पाहून शिवसेना पक्ष प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल नियुक्त आमदारकी ची माळ विजय करंजकर यांच्या गळ्यात टाकायचा निर्धार पक्का केला होता.

त्याप्रमाणे विधान परिषदेसाठी राज्यपालांना बारा स्वीकृत सदस्यांच्या नावांमध्ये विजय करंजकर यांचेही नाव देण्यात आले होते. मात्र पुढील प्रक्रिया होऊ न शकल्याने करंजकर यांचे स्वप्न अधुरे राहते की काय.. असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

दरम्यान खासदारकीच्या तिकिटासाठी विजय करंजकर स्पर्धेत होते, मात्र खासदार हेमंत गोडसे यांची लोकाभिमुखता पाहून गोडसेंना दुसऱ्यांदा उमेदवारीची संधी मिळाली. पर्यायाने विजय करंजकर यांचे पुनर्वसन करण्याचे शिवसेना पक्षाने ठरविले होते. त्याप्रमाणे रणनीती आखण्यात आली. मात्र राज्याच्या सत्तांतर नाट्यामुळे नाशिक जिल्ह्याचा पहिला राज्यपाल नियुक्त आमदारकीचा इतिहास हुकणार आहे.

हेही वाचा: एकनाथ शिंदेंचे समर्थन करणाऱ्या बोर्डाला शिवसैनिकांनी फासले काळे

Web Title: Appointment Of 12 Mla Appointed By The Governor Has Been Delayed Due To Recent Political Situation In Nashik

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..