esakal | सामूहिक बलात्कारातील संशयितांच्या मोक्कावर महासंचालकांचे शिक्कामोर्तब
sakal

बोलून बातमी शोधा

Deepak Pandey

सामूहिक बलात्कारातील संशयितांच्या मोक्कावर शिक्कामोर्तब

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : पोलिस आयुक्तांनी नाशिक रोड येथील सामूहिक बलात्कार प्रकरणातील महिलेसह सात संशयितांवर मोक्का कारवाई करण्यासाठी पोलिस महासंचालकांकडे पाठविलेल्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे नाशिक शहरात नऊ महिन्यांत मोक्कांतर्गत कारवाया झालेल्या सराईतांची संख्या १०८ झाली आहे. (Approval of the director general on the mocca of gang rape suspects)


पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी २० एप्रिलला कारवाईसाठी प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्यातील टोळीचा प्रमुख सुनील निंबाजी कोळे, साथीदार आकाश राजेंद्र गायकवाड (वय २२, रेल्वे ट्रॅक्शन), रवी ऊर्फ फॅन्‍ड्री संतोष कुऱ्हाडे (१९, मुक्तिधाममागे), दीपक समाधान खरात (१९, सिन्नर फाटा), सोमनाथ ऊर्फ सोम्या विजय खरात (१९, गुलाबवाडी, मालधक्का रोड), पूजा सुनील वाघ (२७, अरिंगळे मळा) यांसह एका विधिसंघर्षित बालकाचा समावेश आहे. आतापर्यंत शहरातील लहान लहान सुमारे २२ टोळ्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

हेही वाचा: नाशिकमध्ये विवाहात मास्क, सॅनिटायझरसोबत थर्मामीटर सक्तीचे


नऊ महिन्यांत १०८ कारवाया

पोलिस आयुक्त पांडे यांच्या कारकीर्दीत नऊ महिन्यांत १०८ सराईतांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध अधिनियमानुसार कारवाई करण्याचा विक्रम झाला आहे. जमिनीसाठी खून पाडणारे भूमाफिया, अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कारासह गंभीर स्वरूपाच्या, तसेच गुन्हेगारी सोडू इच्छित नसलेल्या सराईतांवर कारवायांचा बडगा उगारला आहे. दहा वर्षांत झाल्या नाही तेवढ्या गंभीर स्वरूपाच्या कारवाया सुरू केल्या आहेत.


गुन्हेगारी सोडू इच्छिणाऱ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गुन्हेगार सुधार कार्यक्रमासारखे उपक्रम सुरू आहेत. त्याला प्रतिसादही चांगला आहे. अडीचशेहून अधिक जणांनी बंधपत्र लिहून देत, सुधारण्याची इच्छा व्यक्त केली मात्र यानंतरही ज्यांना गुन्हेगारी सोडायचीच नाही अशांवर कारवाया सुरूच राहणार आहेत.
- दीपक पांडे, पोलिस आयुक्त

(Approval of the director general on the mocca of gang rape suspects)

हेही वाचा: नाशिकमध्ये तुटवड्यामुळे सार्वजनिक लसीकरण ठप्प

loading image