esakal | मालेगावात हवेपासून ऑक्सिजन निर्मितीसाठी पावणेतीन कोटी मंजूर
sakal

बोलून बातमी शोधा

Oxygen Plant

मालेगावात हवेपासून ऑक्सिजन निर्मितीसाठी पावणेतीन कोटी मंजूर

sakal_logo
By
प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : मालेगाव शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयांसाठी हवेपासून ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या प्रकल्पासाठी (Oxygen Plant) दोन कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री छगन भुजबळ (chhagan Bhujbal) व कृषीमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

...सोबत या अत्यावश्यक सुविधा मिळणार

मालेगाव शहरात हवेपासून ऑक्सिजन निर्मिती प्लांट, ऑक्सिजन सिलिंडर हेल्थ एटीएम मशीन व इतर बाबींसंदर्भात चर्चा करण्यात आली. ऑक्सिजन प्लांटसाठी निधी मंजूर करण्यात आला. याखेरीज मालेगावसाठी रोज १५० ऑक्सिजन सिलिंडर भरुन मिळतील. दहा ऑक्सिजन कॉन्संट्रेटर मशीन उपलब्ध होणार आहेत. दोन हेल्थ एटीएम मशीन खरेदीसाठी ६० लाख रुपये मंजूर करण्यात आले असून, या मशिनद्वारे ४० प्रकारच्या शारीरीक तपासण्या करण्यात येतील. तसेच, आरटीपीसीआर प्रयोगशाळा मालेगाव येथे उभारण्याची मागणी महापालिकेकडून करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, नाशिक पोलिस आयुक्त दिपक पांण्डेय, जिल्हा पोलिस अधिक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त भालचंद्र गोसावी, उपमहापौर निलेश आहेर, विनोद वाघ, संजय घोडके, शशिकांत अमृतकर उपस्थित होते.

हेही वाचा: VIDEO : नाशिकमध्ये 'म्‍यूकोरमायकोसिस'चे नवे संकट; मधूमेह बाधितांना सावधगिरीचा इशारा

हेही वाचा: दिलासादायक! नाशिकमध्ये ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्या घटली

loading image