esakal | दिलासादायक! नाशिकमध्ये ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्या घटली
sakal

बोलून बातमी शोधा

corona.jpg

दिलासादायक! नाशिकमध्ये ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्या घटली

sakal_logo
By
अरुण मलानी

नाशिक : गेल्‍या दहा दिवसांत तब्‍बल आठ दिवस नव्‍याने आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्‍या संख्येच्‍या तुलनेत कोरोनामुक्‍त झालेल्‍या रुग्‍णांची संख्या अधिक राहिली. कोरोनामुळे हादरलेल्‍या जिल्‍हावासीयांसाठी हे काहीसे दिलासादायक चित्र आहे. ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्येत तब्‍बल नऊ हजार ९६० ने घट झाली असून, सध्या जिल्ह्यात ३६ हजार ९०६ बाधितांवर उपचार सुरू आहेत.

गेल्या दहा दिवसात सतत होतेय घट

गेल्‍या २३ एप्रिलला जिल्ह्यात ४६ हजार ८६६ बाधितांवर उपचार सुरू होते. सातत्‍याने रुग्‍णसंख्येत होत असलेल्‍या वाढीमुळे आरोग्‍य यंत्रणेवर ताण आला होता. ऑक्‍सिजन व इंजेक्‍शनचा तुटवडा, त्‍यातच रुग्‍णालयांत खाटा उपलब्‍ध होत नसल्‍याने रुग्‍ण व त्‍यांच्‍या नातेवाइकांचे मोठे हाल होत होते. एका टप्प्या‍वर जिल्ह्यातील ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्या पन्नास हजारांच्‍या उंबरठ्यावर जाऊन पोचली होती; परंतु गेल्‍या दहा दिवसांपासून कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केलेल्‍या रुग्‍णांच्या संख्येत सातत्‍याने वाढ होत असल्‍याने काहीसा दिलासा मिळाला आहे. राज्‍य शासनाने निर्बंध लागू केल्‍याने सार्वजनिक ठिकाणांवर गर्दी होत नसल्‍याने नव्‍याने आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्‍या संख्येत घट जाणवते आहे. दुसरीकडे उपचार प्रक्रियेत दाखल होऊन कोरोनामुक्‍त होणाऱ्या रुग्‍णांची संख्यादेखील वाढते आहे.

ग्रामीण भागात एक लाख कोरोनामुक्‍त

गेल्‍या काही दिवसांत गाव-खेड्यांत कोरोनाचा फैलाव झाल्‍याचे चित्र होते; परंतु कोरोनामुक्‍त होणाऱ्या रुग्‍णांच्‍या संख्येत ग्रामीण भागातील संख्यादेखील लक्षणीय राहिली आहे. आतापर्यंत नाशिकच्या ग्रामीण भागात एक लाख १८ हजार २३१ बाधित आढळले असून, यांपैकी एक लाख ९९४ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यःस्‍थितीत ग्रामीण भागातील १५ हजार ५८१ बाधितांवर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा: "पराभव पचवायची सवय लावून घ्या…", भुजबळांंचा चंद्रकांत पाटलांंना सल्ला

आकडे बोलतात...

(गेल्‍या दहा दिवसांतील स्‍थिती)

आढळलेले कोरोनाबाधित : ४३ हजार २३२

कोरोनामुक्‍त झालेले रुग्ण : ५२ हजार ९०२

सध्या ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्या : ३६ हजार ९०६

हेही वाचा: नाशिक महापालिका उभारणार एअर ऑक्सिजन प्लांट

मृतांची संख्या नियंत्रणाबाहेरच

कोरोनामुक्‍त रुग्‍णसंख्येत समाधानकारक वाढ होत असली, तरी कोरोना बळींची संख्या अद्यापही आटोक्‍यात आलेली नाही. गेल्‍या दहा दिवसांमध्ये ३९१ कोरोनाबाधितांचा मृत्‍यू झाल्‍याची नोंद आहे. ही आकडेवारीदेखील घटण्याची आवश्‍यकता व्‍यक्‍त होते आहे.

loading image
go to top