Nashik Water Scarcity: वापर वाढल्याने कृत्रिम पाणीटंचाई; सिडको, जुने नाशिक भागात मोटारीद्वारे उपसा

 Water scarcity
Water scarcityesakal

Nashik Water Scarcity : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर, मुकणे व दारणा धरणामध्ये मुबलक पाणीसाठा असूनही पाणीटंचाईला सामोरे जावे लागतं आहे. त्याला कारण म्हणजे दिवाळीनिमित्त अचानक पाण्याचा वापर वाढल्याने टंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.

सिडको, जुने नाशिक भागात मोटर लावून पाणी उपसले जात आहे. त्यामुळे नळजोडणीवरील शेवटच्या घराला पाणी मिळतं नाही. माजी नगरसेवकांना ऐन दिवाळीत महापालिका मुख्यालयात टंचाईच्या निमित्ताने चकरा मारण्याची वेळ आली आहे. वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर दिवाळीनंतर पाणी उपसणाऱ्या मोटर शोधण्याची मोहीम राबविली जाणार आहे.

शहराच्या ५० टक्के भागात गंगापूर, तर ३५ टक्के भागात मुकणे धरणातून पाणीपुरवठा होतो. दारणा धरणाच्या आरक्षित पाण्यातून नाशिक रोड भागात पाणीपुरवठा होतो. नाशिक रोडला जवळपास पंधरा टक्के पाणी पुरविले जाते. तिन्ही धरणांमध्ये शहराला नियमित पाणीपुरवठा होईल इतका पाणीसाठा आहे. (Artificial water scarcity due to increased consumption nashik news)

मेंढीगिरी समितीच्या शिफारशीनुसार मराठवाड्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणात ३७ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा असल्यास वरच्या म्हणजे नाशिक व नगरच्या धरणांतून पाणी सोडण्याचे निर्देश आहे. त्यानुसार गोदावरी विकास महामंडळाकडून जायकवाडीसाठी नाशिकमधील दारणा धरण समूहातून २.६४, तर गंगापूर धरण समूहातून ०.५ टीएमसी पाणी सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट गडद बनले आहे.

किमान दहा टक्के पाणीकपात

गंगापूर, मुकणे व दारणा धरणातून नाशिककरांना पिण्यासाठी महापालिकेने यंदा ६१०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षणाची मागणी केली असली तरी, विसर्गानंतर धरणांमध्ये शिल्लक राहणारा पाणीसाठा लक्षात घेऊनच आरक्षण निश्चित होईल. त्यासाठी सोमवारी (ता. ६) आरक्षणासंदर्भात बैठक होईल त्यात निर्णय घेतला जाणार आहे. दारणा धरणातून १००, तर मुकणे धरणातून १६०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षणाची मागणी आहे.

मुकणे धरण दारणा धरण समूहाचाच भाग आहे. दारणा धरण समूहातून तब्बल २.६४ टीएमसी पाणी जायकवाडीसाठी सोडले जाणार असल्याने मुकणे धरणातून अपेक्षित पाणी आरक्षणात मोठी कपात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिककरांना किमान दहा टक्के पाणीकपात सोसावी लागेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. परंतु आरक्षण निश्चितीच्या बैठकीनंतर हा निर्णय होणार असला तरी नाशिककर सध्या पाणी टंचाईला सामोरे जात आहे.

 Water scarcity
Nashik Onion News: 25 रुपये किलोचा कांदा आहे कुठे? दर पाडण्यास निर्यातीचे धोरण कारणीभूत

शहराच्या सर्वच भागात कमी अधिक दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची ओरड सुरू झाल्याने महापालिका पाणीपुरवठा विभागाने पाणी उपसा करणाऱ्या मोटार शोधण्याची मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

आढाव्यानंतर आले समोर

सध्या सर्वंच धरणातून ५५५ दशलक्ष लिटर कच्चे पाणी उचलले जाते. दररोज नियमित एवढेच पाणी उचलले जात असताना सहाही विभागातून पाण्याची ओरड का होत आहे, याचा आढावा घेतल्यानंतर दिवाळीच्या निमित्ताने पाणी वापर वाढल्याची बाब समोर आली आहे. दिवाळीनिमित्त घर स्वच्छ करणे, कपडे धुणे यासाठी घरोघरी पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे.

त्यातून पाणी साठविले जात आहे. ज्या ठिकाणी साठवण क्षमता नाही तेथे मोटर लावून पाणी उपसले जात आहे. जुने नाशिक व सिडको, सातपूर विभागामध्ये पाण्याची मोटर लावून पाणी उपसले जात असल्याने पाइपलाइनवरील शेवटची जोडणी असलेल्या घराला पाणी उपलब्ध होत नाही.

"धरणात पुरेसा पाणीसाठा आहे. रोजच्या प्रमाणेच धरणातून कच्चे पाणी उपसले जाते. दिवाळीनिमित्त पाण्याचा वापर वाढला आहे. दरवर्षी या कालावधीमध्ये पाणीटंचाई जाणवते. दिवाळीनंतर अचानक पाणी मागणीत घट होते. दिवाळीनंतर पाणी मोटर शोधण्याची मोहीम राबविली जाईल." - संजय अग्रवाल, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग.

 Water scarcity
Nashik Krishithon 2023: नाशिकमध्ये 23 नोव्हेंबरपासून ‘कृषिथॉन’; कर्तबगारांचा पुरस्काराने होणार सन्मान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com