esakal | जेव्हा सिग्नलवर साक्षात यमराज अवतरतात ..अन् दुसरीकडे घडते "अशी" घटना...
sakal

बोलून बातमी शोधा

yamraj at signal.jpg

यमराजाकडून बुधवारी त्र्यंबक सिग्नलवर वाहतूक नियमांची जनजागृती सुरू असतानाच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूकडे नियमांचे उल्लंघन केल्याने पाठीमागून वेगाने आलेल्या दुचाकीस्वाराने पुढे उभ्या असलेल्या दुचाकीस जोराची धडक दिली. यामुळे दोघांत वाद होऊन वाहतूक काही काळ ठप्प झाली.

जेव्हा सिग्नलवर साक्षात यमराज अवतरतात ..अन् दुसरीकडे घडते "अशी" घटना...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : चालकांकडून वाहतूक नियमांची होणारी पायमल्ली कमी करण्याच्या उद्देशाने सध्या शहरातील सिग्नलवर यमराजाचे पात्र साकारत सिग्नलवर जनजागृती करण्यात येत आहे. 

एकीकडे जनजागृती, तर दुसरीकडे अपघात 
यमराजाकडून बुधवारी त्र्यंबक सिग्नलवर वाहतूक नियमांची जनजागृती सुरू असतानाच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूकडे नियमांचे उल्लंघन केल्याने पाठीमागून वेगाने आलेल्या दुचाकीस्वाराने पुढे उभ्या असलेल्या दुचाकीस जोराची धडक दिली. यामुळे दोघांत वाद होऊन वाहतूक काही काळ ठप्प झाली. 

अन् साक्षात अवतरले यमराज? काय म्हणाले?
वाहतूक नियमांबाबत चालकांमध्ये अनेक वेळा जनजागृती करूनही वाहनचालककांकडून सर्रास नियमांची पायमल्ली केली जाते. त्यातून अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अशा घटनांना आळा बसावा या उद्देशाने पोलिस वाहतूक शाखेतर्फे "यमराज' पात्राचे निर्माण केले आहे. यमराजाची वेशभूषा केलेली व्यक्ती वाहतूक पोलिसांसह शहरातील विविध सिग्नलवर थांबून वाहनचालकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जागृती करत आहे. दुचाकीधारकांनी हेल्मेट, तर चारचाकीचालकांनी सीटबेल्टचा वापर करावा. तसेच सिग्नल लागल्यावर वाहनचालकांनी झेब्रा क्रॉसिंगच्या मागे वाहन थांबवावे. सिग्नलचे काटेकोर पालन करा. असे केले नाही, तर कुठल्या समस्यांना सामोरे जावे लागते याची माहिती वाहनचालकांना यमराजाच्या माध्यमातून दिली जात आहे. मृत्यूची देवता म्हणून यमराजाची ओळख आहे. त्यामुळे वाहनचालकांना त्यांच्या एका चुकीमुळे प्रत्यक्षात यमराजाचा सामना करावा लागू नये. यासाठी वाहतूक पोलिसांकडून ही योजना अमलात आणली गेली आहे. 

हेही वाचा > जेव्हा लॉजवर गणवेशधारी शाळकरी मुलामुलींची धांदल उडते....पोलिसही चक्रावले!

हेही वाचा > थरारक! साक्षात समोर मृत्यू उभा असताना "माऊलीला" कुठे जीवाची पर्वा होती? तिचा जीव बाळामध्येच...