esakal | होम क्वारंटाईन झालेले बच्चू कडू म्हणतात.. "भावांनो हात जोडतो, घरीच थांबा" बाहेर पडू नका, 
sakal

बोलून बातमी शोधा

bacchu-kadu.jpg

बच्चू कडू म्हणतात , घशात थोडे खवखव करत होते. दोन दिवसांत थोडा खोकलाही आला. मनात शंका सतावायला लागली, मी कोरोनाचा बळी तर ठरणार नाही ना...?. म्हणून 23 तारखेला थोडा अमरावती सिव्हील सर्जनला फोन केला. पण त्यांनी फोन उचलला नाही. मग मी अकोला सिव्हील सर्जन श्री. चव्हाण यांना फोन केला. त्यांना म्हटलें, मला थोडी शंका येत आहे. ते म्हणाले, घाबरु नका..

होम क्वारंटाईन झालेले बच्चू कडू म्हणतात.. "भावांनो हात जोडतो, घरीच थांबा" बाहेर पडू नका, 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : प्रहार संघटनेचे नेते मंत्री बच्चू कडू यांना कोरोनाचा रिपोर्ट  निगेटिव्ह आढळल्याने पुढील दहा दिवस होम क्वारंटाईन झाले आहेत. गेले काही दिवस त्यांना हा त्रास होत होता. त्यांनी स्वतःच हा खुलासा केला असुन, भावांनो हात जोडतो, घरीच थांबा. बाहेर पडू नका, असे आवाहन त्यांनी केले आहे. या संदर्भात त्यांनी स्वतःच त्यांच्या अनुभवाचे तीन पानी पत्र सोशल मिडीयावर अपलोड केले आहेत.

बच्चू कडू म्हणतात , घशात थोडे खवखव करत होते. दोन दिवसांत थोडा खोकलाही आला. मनात शंका सतावायला लागली, मी कोरोनाचा बळी तर ठरणार नाही ना...?. म्हणून 23 तारखेला थोडा अमरावती सिव्हील सर्जनला फोन केला. पण त्यांनी फोन उचलला नाही. मग मी अकोला सिव्हील सर्जन श्री. चव्हाण यांना फोन केला. त्यांना म्हटलें, मला थोडी शंका येत आहे. ते म्हणाले, घाबरु नका, उद्या अमरावती सिव्हील सर्जनशी बोलून गोळ्या पाठवतो. तपासणी करायला लावतो. गोळ्या आल्या, तपासणी केली. पण काही निघाल नाही. मी कामाला लागलो.

हेही वाचा > #Lockdown : ...अन् अडकलेल्या 'त्या' गर्भवतीच्या मदतीला 'ते' देवदूतासारखे धावून आले!

मला खूप शंका यायच्या, आपल्याला जर कोरोनाची लागण तर खुप मोठी आफत होईल. आपण रोज घराबाहेर पडत आहोत. इतके लोक आपल्याला भेटतात. आपल्यामुळे इतर लोकांचा बळी जाईल. झोप येत नव्हती. त्यात घरी माझा मुलगा देवा नेहमी मला टोकायचा. त्याचा दहावीचा पेपर होता. तो खूप पोटतिडकीने लोकांना भेटू नका म्हणून सांगायचा. बायको नयना देखील खुप सांगायची. पण लोक ऐकत नसायचे. कुणाला नाही म्हणता येत नव्हते. कोही लोक तर स्वतः म्हणायचे लोकांना भेटू नका, अन्‌ तेच लोक इतर लोकांना घेऊन भेटायला यायचे. भेटणाऱ्यांची गर्दी वाढतच होती. अखेर देवाचे पेपर संपले आणि आम्ही कुरळपूर्णा येथे आलो. माझी सगळ्यांना विनंती आहे, कृपया घरीच थांबा. घराबाहेर पडू नका,असे बच्चू कडू म्हणाले. 
दरम्यान, मंत्री बच्चू कडूंच्या या पोस्टने खळबळ उडाली आहे. अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी संपर्क करुन याबाबत विचारणा केली आहे.

हेही वाचा > ह्रदयद्रावक! 'ते' दोघं मज्जाक - मस्ती करत घराकडे निघाले...मात्र, वाटेत काळाने अडवलं

loading image