esakal | नाशिक : खासगी कंपनीविरोधात रुग्णवाहिका चालकांचा बेमुदत बंद
sakal

बोलून बातमी शोधा

indefinite bandh of ambulance drivers against a private company in nashik

नाशिक : खासगी कंपनीविरोधात रुग्णवाहिका चालकांचा बेमुदत बंद

sakal_logo
By
युनूस शेख

जुने नाशिक : परराज्यातील खासगी कंपनीने शहरात रुग्णसेवा सुरू केली आहे. यामुळे रुग्णवाहिका सेवा देणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे खासगी कंपनीविरोधात मंगळवारी (ता. ७) जनसेवा ॲम्बुलन्स सेवा संस्थेतर्फे रुग्णवाहिका आणि शववाहिका बेमुदत बंदला सुरवात करण्यात आली.

सकाळपासून बेमुदत बंद सुरू होताच रुग्णवाहिकेची आवश्यकता भासणाऱ्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे चित्र जिल्हा रुग्णालय बाहेर दिसून आले. परराज्यातील एका खासगी कंपनीने शहरात रुग्णसेवा सुरू केल्याने शहरातील रुग्णवाहिका चालकांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यानिमित्ताने त्यांनी कंपनी चालकांशी संपर्क साधत शहरातील सर्व खासगी रुग्णवाहिका त्यांनी चालवण्यास घ्याव्यात, अन्यथा त्यांनी कार्यालय बंद करण्याची मागणी केली. कंपनी चालकांकडून कुठलाही प्रतिसाद न आल्याने हा बंद पुकारल्याचे जनसेवा ॲम्बुलन्स सेवा संस्था अध्यक्ष पाशा शेख यांनी सांगितले. शहरभरात १२५ रुग्णवाहिका सेवा देत आहे. या सेवेवर दोनशे ते तीनशे कुटुंबीयांची उपजीविका सुरू आहे. मालकांनी, कामगारांची संख्या सुमारे दोनशे ते अडीचशे आहे. काही दिवसापूर्वी परराज्यातील एका कंपनीने शहरात जम बसविण्यास सुरवात केली असून, त्यांच्याकडून रुग्णवाहिका सेवा पुरवली जाणार आहे. त्यानिमित्ताने कंपनी अधिकारी, कामगार विविध खासगी रुग्णालयाची भेट घेऊन त्यांना कमिशन देण्याचे आमिष दाखवून त्यांची रुग्णवाहिका सेवा घेण्यास सांगत असल्याचा आरोप संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. प्रशासनाने शहरातील रुग्णवाहिका चालकांना न्याय द्यावा. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणे यासह विविध आंदोलने केली जाणार असल्याचा इशारा देण्यात आला.

हेही वाचा: निफाडला आगीचे तांडव! नऊ दुकाने भस्मसात

स्थानिक रुग्णवाहिका चालक- मालक यांना डावलून कंपनी स्वतःचे हित बघत आहे. त्यामुळे स्थानिकांवर उपासमारीची वेळ येणार आहे. कंपनीने आमच्या रुग्णवाहिकादेखील ताब्यात घेऊन चालविल्यास आमचा कंपनीस विरोध नाही.

- पाशा शेख, संस्थाध्यक्ष.

आजीची तब्येत गंभीर झाल्याने तिला खासगी रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका घेण्यास गेलो. परंतु, बंद असल्याने वेळेवर रुग्णवाहिका मिळू शकली नाही. बरीच धावपळ करावी लागली.

- गणेश साळवे, रुग्णाचा नातेवाईक.

हेही वाचा: महिंद्रा स्कॉर्पियो घ्यायचीय? मग हे आहे सर्वात स्वस्त मॉडेल

loading image
go to top