esakal | बाळासाहेब सानप यांचा भाजपमध्ये पुर्नप्रवेशाचा मार्ग मोकळा; विरोधक गटामध्ये नाराजी
sakal

बोलून बातमी शोधा

sanap bjp.jpg

अनेक महिन्यांपासून राजकीय विजनवासात राहिलेले माजी आमदार बाळासाहेब यांचा भाजपचा पुनर्प्रवेशाचा मुहूर्त निश्‍चित झाला आहे. सोमवारी (ता. २१) प्रदेश कार्यालयात त्यांना सन्मानपूर्वक प्रवेश दिला जाणार आहे. सानप यांच्या भाजप प्रवेशामुळे समर्थक नगरसेवक व कार्यकर्त्यांमध्ये आनंदोत्सव सुरू झाला असला तरी दुसरीकडे विरोधक गटामध्ये नाराजी पसरली आहे.

बाळासाहेब सानप यांचा भाजपमध्ये पुर्नप्रवेशाचा मार्ग मोकळा; विरोधक गटामध्ये नाराजी

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : अनेक महिन्यांपासून राजकीय विजनवासात राहिलेले माजी आमदार बाळासाहेब यांचा भाजपचा पुनर्प्रवेशाचा मुहूर्त निश्‍चित झाला आहे. सोमवारी (ता. २१) प्रदेश कार्यालयात त्यांना सन्मानपूर्वक प्रवेश दिला जाणार आहे. सानप यांच्या भाजप प्रवेशामुळे समर्थक नगरसेवक व कार्यकर्त्यांमध्ये आनंदोत्सव सुरू झाला असला तरी दुसरीकडे विरोधक गटामध्ये नाराजी पसरली आहे.

बाळासाहेब सानप यांचा भाजपमध्ये पुनर्प्रवेश 

महापालिकेत भाजपची सत्ता असूनही सानप व समर्थक नगरसेवकांमुळे सत्ता मिळविताना दमछाक झाल्याने आगामी निवडणुकीत अधिक पडझड होऊ नये म्हणून सानप यांना चाल दिल्याचे बोलले जात आहे. २०१७ मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत सानप यांची कारकिर्द बहरली होती. परंतू माजी पालकमंत्री गिरीष महाजन व विधान परिषदे निवडणुकीच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांच्या खप्पा मर्जीमुळे सानप यांना हळुवारपणे साईडट्रॅक करण्यात आले. गेल्या वर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आदल्या दिवशी मनसेतून एनवेळी ॲड. राहुल ढिकले यांना भाजप मध्ये प्रवेश देताना दुसरीकडे उमेदवारी देखील जाहीर केल्याने नाराज सानप यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून निवडणुक लढविली. पराभवानंतर सानप यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

हेही वाचा >> मनाला चटका लावणारी बातमी! माऊलीच्या नशिबी दोनदा दफनविधी अंत्यसंस्काराचा योग; जुळली मुलांशी झालेली ताटातूट

आगामी निवडणुकीत पडझड रोखण्याचे प्रयत्न 

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर विधान परिषद किंवा महामंडळ मिळेल अशी अपेक्षा त्यांना होती परंतू गेल्या सव्वा वर्षात अपेक्षित पदे मिळाली नाही. याच दरम्यान महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीवेळी भाजपच्या सत्तेला खिंडार पडण्याची दाट शक्यता निर्माण करण्यात आली होती त्यात सानप यांचा मोठा वाटा असल्याने भाजपला त्यांचे उपद्रव मुल्य लक्षात समजले होते. उत्तर महाराष्ट्रातील जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकतं हाती घड्याळ बांधल्याने भाजपसाठी मोठा धक्का आहे. खडसे यांच्या विरोधी भुमिकेमुळे ओबीसी नेत्यांची माळ ओवण्याचे काम भाजपकडून होत आहे. त्याचाचं एक भाग म्हणून सानप यांचा पुर्नप्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.

हेही वाचा >> बळीराजाच्या नशिबी दुर्दैवच; जेव्हा स्वत:च्याच डोळ्यादेखत संसाराची राखरांगोळी होते तेव्हा..

समर्थकांना निरोप देत मुंबईत शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी

मध्यंतरीच्या काळात सानप यांच्या मातोश्रींचे निधन झाल्याने त्याचे निमित्त साधून गिरीष महाजन यांनी भेट घेत पुर्नप्रवेशाचे बीज रोवले होते. जळगावातील बीएचआर घोटाळ्यासंदर्भात महाजन अडचणीत आल्याने प्रवेश लांबला. शिवसेनेने देखील सानप यांच्या सारखा मोहरा हातून जावू नये म्हणून मातोश्रीवर बोलावून घेताना मोठी जबाबदारी देण्याचे आश्‍वासन दिले होते. परंतू दोन दिवसातचं सानप यांच्या पुर्नप्रवेशावर विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी शिक्कामोर्तब केले. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय यांनी मध्यस्ती करताना सोमवारी (ता. २१) प्रवेशाचा मुहूर्त निश्‍चित केला. मुहूर्ताची निश्‍चिती झाल्यानंतर सानप यांनी तातडीने समर्थकांना निरोप देत मुंबईत शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी केली आहे. 

समर्थक आनंदात, विरोधक सरसावले 
पक्ष प्रवेशामुळे सानप समर्थकांमध्ये जसे आनंदाचे वातावरण आहे तसे विरोधकांमध्ये देखील नाराजी पसरली आहे. सानप यांच्याकडे आठ, दहा नगरसेवक निवडून आणण्याची क्षमता असली तरी त्यांच्या पुर्नप्रवेशनंतर त्यांची ताकद वाढू नये म्हणून विरोधक देखील सरसावले आहेत. विद्यमान आमदारांसह काही नगरसेवकांनी विरोध सुरु केल्याने भाजपला आगामी महापालिका निवडणुक सोपी नसल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. 

सोमवारी मुंबईत घरवापसी 
पंचवटी - भाजपचे नाशिक पूर्वचे माजी आमदार बाळासाहेब सानप हे सोमवारी (ता.२१) दुपारी बारा वाजता भाजपमध्ये पुनप्रवेश करत आहेत. सोमवारी मुंबईतील प्रदेश भाजप कार्यालयात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रक्षप्रवेश होत असल्याची माहिती सानप यांनी सकाळशी बोलताना दिली. सानप यांच्या भाजपमधील पुनप्रवेशाने नाशिक पूर्वमधील पक्षाची ताकद वाढणार असलीतरीही वर्षादीडवर्षांपूर्वी झालेल्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीत आलेली कटुता ते विद्यमान पदाधिकारी कसे मिटवितात, त्यांचे मनोमिलन कसे होते, यावर बरेच काही अवलंबून असणार आहे. 
 

loading image