esakal | नाशिक:पीओपी मूर्तींना पुढील वर्षांपासून बंदी
sakal

बोलून बातमी शोधा

Ganesha

नाशिक: पीओपी मूर्तींना पुढील वर्षांपासून बंदी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक: उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नदी प्रदूषण रोखण्यासाठी गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिस पासून तयार करण्यात आलेल्या मूर्तींचे नदी पात्रात विसर्जन करता येणार नसल्याचा निकाल दिल्याने त्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने पुढील वर्षांपासून पीओपी मूर्ती उत्पादन, विक्री व साठ्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.

हेही वाचा: नाशिक : ११ वीच्या तिसऱ्या गुणवत्ता यादीतही कट-ऑफ ९० टक्क्‍यांवर

नागपूर महापालिकेने पीओपी मूर्ती विक्री व साठवणूक करण्यास बंदी घातली होती. या विरोधात श्री गणेश मूर्तिकार फाऊंडेशनच्या वतीने नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. पीओपीच्या मूर्तींच्या साठ्यांची विक्री करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी देताना पीओपी मूर्तीचा साठा केलेल्या मूर्ती विक्रीला परवानगी देण्यात आली परंतु पीओपी पासून तयार करण्यात आलेल्या मूर्तींचे विसर्जन करता येणार नसल्याचे आदेशित केले.

या पार्श्‍वभूमीवर नाशिक महापालिकेने पुढील वर्षांपासून पीओपी मूर्ती उत्पादन, विक्री व साठ्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी हा निर्णय लागू होणार नाही. महापालिकेने शाडू मातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचे आवाहन केल्यानंतर त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. शाडू मूर्ती विक्री व प्रदर्शन देखील महापालिकेने भरविले होते. पीओपी मूर्ती प्रतिष्ठापना केलेल्या नागरिकांना नदी मध्ये विसर्जन न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पीओपी मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी महापालिकेच्या वतीने अमोनिअम कार्बोनेट पावडर मोफत उपलब्ध करून दिली आहे.

विसर्जनाकरिता कृत्रिम तलाव

पुढील वर्षांपासून पीओपी मूर्तीची प्रतिष्ठापना करता येणार नाही. यावर्षी पीओपी मूर्तीची प्रतिष्ठापना करणाऱ्या नागरिकांसाठी मूर्ती विसर्जनाकरिता कृत्रिम तलाव, टॅँक ऑन व्हिल्स उपक्रम राबविले जाणार आहे. मात्र पुढील वर्षापासून पीओपी मूर्तींबाबत पालिकेचे कठोर धोरण राहणार असल्याचे आयुक्त जाधव यांनी स्पष्ट केले.

loading image
go to top