
नाशिक : देशाच्या स्वातंत्र्याला पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ‘हर घर तिरंगा’ ची साद केंद्रातील मोदी सरकारने घातली आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिका मुख्यालयात हे ध्वज दाखल झाले असून, पंचवटीतील मनपा विभागीय कार्यालयातही तब्बल २५ हजार ध्वज विक्रीसाठी दाखल झाले आहेत. (best response to NMC flag sale 1800 flags sold azadi ka amrut mahotsav nashik Latest marathi news)
दोन दिवसांत तब्बल अठराशे ध्वजाची विक्री झाली आहे. दाखल झाल्यापासून आजवर अठराशे झेंड्याची विक्री झाल्याचे पंचवटी विभागीय अधिकारी कैलास राभडिया यांनी सांगितले. विभागीय कार्यालयातील सभापती कक्षात या झेंड्याची छाननी सुरू असून, त्यानंतर या झेंड्याची विक्री सुरू आहे.
२१ रूपयांत हा झेंडा उपलब्ध आहे. आजवर माजी महापौर रंजना भानसी, माजी नगरसेवक सुरेश खेताडे, हेमंत शेट्टी यांच्यासह काही नागरिकांनीही या झेंड्याची खरेदी केल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.