Nashik News: देयकांअभावी भरारी पथके वाहनांपासून वंचित! ZP आरोग्य विभागाचा घोळ

ZP Nashik latest marathi news
ZP Nashik latest marathi newsesakal

Nashik News : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून नेमल्या जाणाऱ्या भरारी पथकांसाठी ५४ वाहने पुरवणाऱ्या पुरवठादाराची मुदत गत ऑक्टोबर २०२२ मध्ये संपुष्टात आल्याने तत्पूर्वीच नवीन निविदा राबविण्याची गरज असताना त्यास मुदतवाढ दिली.

यावर ओरड झाल्यावर मार्च २०२३ मध्ये निविदा प्रक्रिया सुरू केल्यानंतर त्याचा तांत्रिक लिफाफा उघडल्यानंतर वित्तीय लिफाफा अद्यापही उघडण्यात आलेला नाही.

नवीन पुरवठादाराची निवड करण्यास होत असलेला उशीर व जुन्या पुरवठादाराची वादात सापडलेली मुदतवाढ यामुळे सध्या भरारी पथके वाऱ्यावर असून निधी अभावी त्याचे देयकही प्रलंबित आहेत. (Bharari teams deprived of vehicles for lack of payments Mixture of ZP Health Department Nashik News)

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून आदिवासी दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरवण्यासाठी भरारी पथकांची नेमणूक केली जाते. या भरारी पथकाच्या वाहनात एक वैद्यकीय अधिकाऱ्याचे वेतन, वाहनाचा चालकासह खर्च व औषधे यांचा खर्च करण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून दरवर्षी चार कोटी रुपये निधी दिला जातो.

आरोग्य विभागाने या निधीतून ५४ भरारी पथके तयार केली असून त्यासाठी वाहन पुरवठादाराची निविदा प्रक्रियेतून निवड केली जाते. या भरारी पथकासाठी वाहने पुरवणाऱ्या पुरवठादाराची मुदत ऑक्टोबर २०२२ मध्ये संपली.

मुदत संपण्याआधीच आरोग्य विभागाने नवीन पुरवठादार नेमण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवणे गरजेचे होते. मात्र, त्यावेळी निधी नसल्याचे कारण देत आरोग्य विभागाने जुन्याच पुरवठादाराची सेवा सुरू ठेवली.

विशेष म्हणजे संबंधित पुरवठादारास मुदतवाढ देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी देखील घेतली नाही. आदिवासी विकास विभागाने मार्च अखेरीस पुनर्नियोजनातून निधी देण्याची तयारी दर्शविल्यानंतर आरोग्य विभागाने मार्चमध्ये नवीन निविदा प्रक्रिया राबवली.

पुनर्नियोजनातून या योजनेसाठी ७२ लाख रुपये निधी मंजूर झाला असला, तरी जिल्हा कोशागार कार्यालयातून अद्याप धनादेश वितरित केले नाहीत. यामुळे संबंधित ठेकेदारास मागील रक्कम देता आलेली नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ZP Nashik latest marathi news
Nashik News: शहर -ग्रामीण पोलिस दलात नवीन अधिकारी! आयुक्तालयात तांबे, डॉ. कोल्हे, देशमुख, जाधव, बारी

यामुळे त्याने वाहन पुरवठा करणे थांबविले आहे. दरम्यान आरोग्य विभागाने राबवलेल्या निविदेसाठी तीन पुरवठादारांनी सहभाग घेतला असून त्याचा तांत्रिक लिफाफा उघडल्यानंतही अद्याप वित्तीय लिफाफा उघडण्यास प्रशासनाला मुहूर्त सापडत नसल्याचे दिसत आहे.

दुचाकीवरून आदिवासी भागात आरोग्य सेवा

गत देयके न मिळाल्याने पुरवठादार वाहने पुरवत नसून त्यामुळे आदिवासी भागातील रहिवाशांची आरोग्य सेवा वाऱ्यावर असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. सध्या भरारी पथकातील डॉक्टरांना वाहन नसले, तरी ते दुचाकीवरून आदिवासी भागात सेवा पुरवत असल्याचे प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

या वाहनांची गरज पावसाळ्यात अधिक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

ZP Nashik latest marathi news
Nitesh Rane : पोलिसांच्या चौकशीतून सत्य येईल बाहेर : नितेश राणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com